Bjp Flag
Bjp Flag  saam tv
महाराष्ट्र

नुपूर शर्मांच्या समर्थनार्थ पोस्ट केल्यामुळे १० जणांना धमक्या; भाजप खासदाराचा आरोप

साम टिव्ही ब्युरो

अमर घटारे

अमरावती : अमरावतीमधील मेडिकल व्यावसायिक उमेश कोल्हे हत्या प्रकरणात अनेक नवनवे खुलासे समोर येत आहेत. नुपूर शर्मा (Nupur Sharma) यांच्या समर्थनार्थ पोस्ट सोशल मीडियावर शेअर केल्यामुळे अमरावतीमधील (Amravati) मेडिकल व्यावसायिक उमेश कोल्हे यांची २१ जून रोजी हत्या करण्यात आली होती. त्यानंतर कोल्हे यांच्या हत्येने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली. आता शहरातील १० लोकांना नुपूर शर्माबद्दल पोस्ट शेअर केल्यानं जीवे मारण्याच्या धमक्या आल्या असल्याचा गंभीर आरोप भाजप खासदार अनिल बोंडे यांनी केला आहे. ( Amravati Crime news In Marathi )

अमरावतीत नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ पोस्ट केल्याने उमेश कोल्हे यांची हत्या करण्यात आली होती. उमेश कोल्हे यांची हत्या नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ पोस्ट केल्याने झाल्याचे काल अमरावती पोलिसांनी देखील पुष्टी दिली. तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आदेश देऊन या प्रकरणाचा तपास एनआयएकडे (NIA) सोपावला आहे. तसेच आतापर्यंत या प्रकरणात सर्व आरोपीेंना पोलिसांनी अटक केली आहे. त्यानंतर आता शहरातील १० लोकांना नुपूर शर्माबद्दल पोस्ट शेअर केल्याने जीवे मारण्याच्या धमक्या आल्या, असा गंभीर आरोप भाजप नेते व खासदार अनिल बोंडे यांनी केला आहे.

शहरातील डॉ. गोपाल राठी यांनीही पोस्ट शेअर केल्या होत्या. त्यामुळे डॉ. राठी यांनी सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत माफी मागितली. 'माझ्यामुळे कोणत्या धर्मातील लोकांच्या भावना दुखावल्या असतील तर माफी मागतो. यानंतर अशी चूक होणार नाही', असंही डॉक्टर राठी यांनी आपल्या माफीनाम्यामध्ये म्हटलं आहे. त्यानंतर बोंडे यांनी ज्यांना धमक्या आल्यात त्यांची अमरावती पोलिसांनी चौकशी केली नाही असा आरोपही केला आहे. तर धमक्या आलेल्या सर्व लोकांच्या चौकशी केल्या पाहिजे, अशी मागणी देखील बोंडे यांनी यावेळी केली. मात्र, अमरावतीच उमेश कोल्हे यांचं प्रकरण देशभरात गाजत असताना अमरावती पोलीस दिरंगाई का करीत आहे असा सवाल उपस्थित होत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MI vs SRH: मुंबईने हैदराबादचं वादळ रोखलं! पलटणला जिंकण्यासाठी १७४ धावांचं आव्हान

Today's Marathi News Live: सुजय विखे पाटील यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी घेणार सभा

Maharashtra Politics : ...मग बघू कोणाची हिंमत होते; 'नोकरीत मराठी माणूस नको' पोस्टनंतर मनसे आक्रमक

Mumbai News: नायर रुग्णालयाच्या पंधराव्या मजल्यावरून उडी मारून कर्मचाऱ्याची आत्महत्या, धक्कादायक VIDEO आला समोर

Janhvi Kapoor : परम सुंदरी; जान्हवी कपूरच्या सौंदर्यावर नेटकऱ्यांच्या नजरा खिळल्या...

SCROLL FOR NEXT