मतदारसंघात गेल्यावर शिवसैनिकांना काय उत्तर देणार; बंडखोरांना आदित्य ठाकरेंचा सवाल

विधानसभेच्या दोनदिवसीय विशेष अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली. या अधिवेशनात विश्वासदर्शक ठराव आणि विधानसभा अध्यक्षांची निवड झाली.
Aditya Thackeray
Aditya ThackeraySaam Tv

मुंबई : बंडखोर आमदारांनी आज आमच्या डोळ्यात डोळे घालून बघितले नाही, ते आमदार आता मतदारसंघातील शिवसैनिकांना काय उत्तर देणार आहेत, कधीपर्यंत बसमधून प्रवास करणार, असा टोला आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना लगावला.

विधानसभेच्या दोनदिवसीय विशेष अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली. या अधिवेशनात विश्वासदर्शक ठराव आणि विधानसभा अध्यक्षांची निवड झाली. अध्यक्षपदासाठी भाजपचे (BJP) राहुल नार्वेकर, तर शिवसेनेचे राजन साळवी यांच्यात लढत झाली. या लढतीत भाजपचे राहुल नार्वेकर १६४ मतांनी विजयी झाले.

Aditya Thackeray
शिंदे साहेब आपलंसं करून घ्या नाहीतर काही खरं नाही; अजित पवारांची मिश्किल टिप्पणी

बंडखोर आमदारांनी शिवसेनेच्या व्हीपच्या विरोधात मतदान केले. उपाध्यक्ष यांनी तो व्हीप मान्य केला आहे. आज ते आमदार मोरॅलिटी टोस्टमध्ये फेल झाले आहेत. कुणीहीव डोळ्यात डोळे घालून बघत नव्हते, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली.

Aditya Thackeray
"फडणवीसांच्या 'त्या' घोषणेनंतर भाजपचे धडाधडा रडायला लागले; गिरीश महाजनांचं तर रडणं बंद होईना"

पहिल्याच परीक्षेत शिंदे सरकार पास

विधानसभेच्या दोनदिवसीय विशेष अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. या अधिवेशनात विश्वासदर्शक ठराव आणि विधानसभा अध्यक्षांची निवड झाली. अध्यक्षपदासाठी भाजपचे (BJP) राहुल नार्वेकर, तर शिवसेनेचे राजन साळवी यांच्यात लढत झाली. या लढतीत भाजपचे राहुल नार्वेकर विजयी झाले.

राहुल नार्वेकर यांना आतापर्यंत १४५ पेक्षा जास्त सदस्यांचे मतदान झाले आहे. बहुमताचा आकडा त्यांनी पार केला आहे. बहुजन विकास आघाडी, मनसे आणि बच्चु कडू यांच्या पक्षाने राहुल नार्वेकर यांना मतदान केले आहे. नार्वेकर यांच्या विधानसभा अध्यक्षपदाची फक्त औपचारिक घोषणा बाकी आहे.

सरकार स्थापन केल्यावर लगेचच राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी शिंदे यांना बहुमत सिद्ध करण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार रविवार आणि सोमवार असे दोन दिवस विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावण्यात आले. सोमवारी विश्वासदर्शक ठराव मांडला जात आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com