मुंबई - विधानसभेच्या दोनदिवसीय विशेष अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली. या अधिवेशनात विश्वासदर्शक ठराव आणि विधानसभा अध्यक्षांची निवड झाली. अध्यक्षपदासाठी भाजपचे (BJP) राहुल नार्वेकर, तर शिवसेनेचे राजन साळवी यांच्यात लढत झाली. या लढतीत भाजपचे राहुल नार्वेकर १६४ मतांनी विजयी झाले. यावेळी माजी उपमुख्यमंत्री राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी राहुल नार्वेकर यांची अभिनंदन केले. यानंतर नव्या अध्यक्षांचे अभिनंदन राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी जोरदार फटकेबाजी केली.पहिल्याच दिवशी अजित पवार यांनी जोरदार फटकेबाजी करत अनेक शाब्दिक षटकार लगावले.
हे देखील पाहा -
अजित पवार म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री हे होणार अशी घोषणा करताच त्याठिकाणी एकदम पिनड्रॉप सायलेन्स होता. भाजपची काही मंडळी तर धडाधडा रडायला लागली. गिरीश महाजनांचं तर रडणं बंद होईना. फेटा बांधायला दिला तर डोळ्याचं पाणी पुसायला वापरात आहे. भाजपच्या १०५ आमदारांनी सांगावं की खरंच झालं ते कसं झालं. चंद्रकांत दादा पाटील तुम्ही बेंच वाजवू नका तुम्हालाच मंत्रीपद मिळत की नाही. सभागृहात धाकधूक आहेत. शिवसेनेतून गेलेले 40 जणांपैकी किती जणांना मंत्रीपद मिळेल माहिती नाही अशी टीका अजित पवार यांनी केली आहे.
नार्वेकर ज्या पक्षात जातात त्या नेतृत्वाला ते आपलंसं करतात
अजित पवार म्हणाले, राहुल नार्वेकर खूप हुशार आहेत. ते पक्ष प्रमुखांना आपलेसे करुन घेतात. ते शिवसेनेत होते, तेव्हाही त्यांनी आदित्य ठाकरे यांना जवळ केल होते. पुढ ते आमच्याकडे आम्हालाही त्यांनी आपलंसं केले. आम्ही त्यांना मावळ लोकसभा मतदार संघात उभ केलं. पण यात त्यांचा पराभव झाला, आता नार्वेकर भाजपमध्ये गेले आहेत. त्यांनी देवेंद्र फडणवीस यांनाही आपलंसं केले आहे, त्यामुळे एकनाथ शिंदे तुम्ही जरा जपून राहा आपलंसं करुन घ्या नाहीतर काही खरं नाही, अशी मिश्किल टिप्पणी अजित पवार (Ajit Pawar) यांनी केली.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.