भाजप आमदारांच्या निलंबनाचे बीड मध्ये पडसाद... Saam Tv
महाराष्ट्र

भाजप आमदारांच्या निलंबनाचे बीड मध्ये पडसाद...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

विनोद जिरे

बीड - अधिवेशनामध्ये गोंधळ घातल्याच्या आरोपावरून 12 भाजप BJP आमदारांना निलंबित केल्यानंतर भाजप राज्यभर आक्रमक झाले आहे. याचे पडसाद आज बीडमध्ये Beed उमटले.  बीड भाजपच्या वतीने महाविकास आघाडीच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करून, या घटनेचा निषेध करण्यात आला आहे. यावेळी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी सरकार विरोधात प्रचंड घोषणाबाजी केली.  BJP MLAs suspension reverberates in Beed

हे देखील पहा -

सरकार ओबीसीचा OBC आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असून सामान्यांचे प्रश्न मांडले म्हणून या बारा आमदाराचे निलंबन केले गेले आहे. असा आरोप देखील भारतीय जनता पार्टीच्या वतीने करण्यात आला आहे. दरम्यान हे निलंबन मागे न घेतल्यास तीव्र आंदोलन करू असा इशारा भाजपकडून देण्यात आला आहे. विधानसभेत गैरकृत्य केल्याचा ठपका ठेवत भाजपच्या बारा आमदारांना एक वर्षासाठी निलंबनाची कारवाई केली. 

या कारवाईनंतर याचे पडसाद वसईत उमटण्यास सुरुवात झाली आहे. विधानसभेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis यांना ओबीसी OBC आरक्षणावर बोलू दिले नाही. या गोंधळातच ओबीसी आरक्षणाचा इम्पेरील डेटा केंद्र सरकारकडून Central Government मिळावा, याबाबत ठराव मंजूर करण्यात आला. या मुद्द्यावरून सत्ताधारी महाविकास आघाडी आणि विरोधी पक्षात चांगलीच शाब्दिक चकमक झाली. दरम्यान, अशी धक्काबुक्की झाली नसल्याचा दावा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tirupati Laddoos: 'तिरुपती बालाजीच्या लाडूंमध्ये चरबीचा वापर'; सीएम चंद्राबाबू नायडूंचा रेड्डी यांच्या सरकारवर गंभीर आरोप

STREE 2 च्या कोरिओग्राफरला केली अटक, अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप

Ajit Pawar: वाचाळवीरांनी मर्यादा पाळाव्यात; अजित पवारांनी CM शिंदेंसमोरच आमदारांचे टोचले कान

Friday Horoscope: शुक्रवारी या 5 राशींचे नशीब फळफळणार, देवी लक्ष्मीची होणार कृपा; वाचा राशिभविष्य

Maharashtra News Live Updates: राज्य सहकारी बँकेच्या कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! बँकेच्या कर्मचाऱ्यांना आजीवन मिळणार १०००० रुपये पेन्शन

SCROLL FOR NEXT