Suresh Dhas Saam Tv News
महाराष्ट्र

Beed Politics : माझ्याविरुद्ध षडयंत्र, मुख्यमंत्र्यांच्या कानावर घालणार; विरोधकांच्या टीकेनंतर सुरेश धस आक्रमक, नेमकं काय म्हणाले?

Suresh Dhas meets Dhananjay Munde: धनंजय मुंडेंच्या भेटीनंतर सुरेश धस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कुणीतरी व्यवस्थितपणे षडयंत्र रचत असल्याचं त्यांनी सांगितलं.

Bhagyashree Kamble

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर भाजपचे आमदार सुरेश धस यांनी नागरी व पुरवठा मंत्री धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडला लक्ष्य केलं होतं. धस यांच्या रडारवर मुंडे होते. मात्र, १४ फेब्रुवारीला सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंची घेतलेल्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं. विरोधकांनी टीका करत धस यांना धाऱ्यावर धरलं. टीकेची झोड उठल्यानंतर सुरेश धस यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

षडयंत्र मी मुख्यमंत्र्यांच्या कानावर घालणार

धनंजय मुंडे यांची मी घेतलेली भेट आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे मी जेवणासाठी गेलो ती भेट या दोन्ही एकत्र सांगण्यात आल्या आहेत. कुणीतरी व्यवस्थितपणे षडयंत्र रचत आहे. हे षडयंत्र मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कानावर घालणार आहे, असं सुरेश धस म्हणाले. ज्यांनी षडयंत्र रचले आहे, त्यांचा मी बंदोबस्त करणार असल्याचंही धस यांनी स्पष्ट केलं आहे.

संतोष देशमुख प्रकरणावरून लक्ष वळवण्याचा प्रयत्न

'धनंजय मुंडे सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांना भेटायला पाहिजे होते. पंकजा मुंडे यांनी देखील देशमुख कुटुंबियांची भेट घ्यायला हवी होती. मात्र, दोघेही भेटले नाहीत. या गोष्टीवर चर्चा झालेली नाही. बावनकुळे यांनी आमची भेट झाल्याचं सांगितलं. त्यावर चर्चा झाली.

मी फक्त टीव्हीवर बोलत नाही. तर, कायदेशीर सुद्धा चौकशी करून तक्रारी करतो. हे सगळं षडयंत्र आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी हा डाव रचला जात आहे', असा आरोप सुरेश धस यांनी केला आहे.

शेवटपर्यंत लढा देणार

'धनंजय देशमुख आणि मस्साजोगचे नागरीक माझ्यासोबत आहेत. जरांगे पाटील यांची सुद्धा भूमिका माझ्यासोबत राहील. मी आजही ठाम आहे, उद्याही आणि जोपर्यंत आरोपींना फाशी होणार नाही, तोपर्यंत ठाम राहणार. तसेच शेवटपर्यंत लढा देणार' असल्याचं धस यांनी सांगितलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Eknath Shinde : 'जय गुजरात'च्या घोषणेनंतर एकनाथ शिंदेंचं स्पष्टीकरण, उद्धव ठाकरेंचा VIDEO दाखवत विरोधकांना प्रत्युत्तर

DR. MC Dawar Death : आधी २ रुपये, आता २० रुपयांमध्ये करायचे उपचार; गरीबांचे डॉक्टर पद्मश्री एमली डावर काळाच्या पडद्याआड

Maharashtra Politics: सुषमा अंधारे अन् कुणाल कामराच्या अडचणीत वाढ; विधिमंडळात हक्कभंग प्रस्ताव मंजूर

Maharashtra Live News Update: वाल्मीक कराडची पोलखोल करणाऱ्या विजयसिंह बांगर यांनी घेतली अप्पर पोलीस अधीक्षकांची भेट

Auto Rickshaw Bag : बाजारात आलीये नवीन ऑटो रिक्षा बॅग, फॅशनचा नवा ट्रेंड

SCROLL FOR NEXT