Rohit Pawar vs Raam Shinde: एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार कर्जत-जामखेडमध्ये एमआयडीसी सुरू होण्यासाठी प्रयत्न करत असताना, दुसरीकडे भाजप आमदार राम शिंदे यांनी गुरूवारी विधानपरिषदेत खळबळजनक दावा केला. कर्जत-जामखेड एमआयडीसीला मिळणारी जमीन ही नीरव मोदीची असल्याचा दावा आमदार राम शिंदे यांनी केला आहे.
त्यांच्या या दाव्याने मोठी खळबळ उडाली आहे. त्यावर, ही जमीन फरार नीरव मोदी याची आहे का, याची सखोल चौकशी केली जाईल, असे आश्वासन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिले. कर्जत तालुक्यात शेतकऱ्यांच्या जमिनी कवडीमोल दरात गुंतवणूकदारांनी विकत घेतल्या आहेत.
त्यांची नावे नीरव मोदी, मनीषा कासोले, नयन गणेश अग्रवाल, कमलेश शाह, पंकज विनोद खन्ना, गणेश अग्रवाल अशी आहेत. ही एमआयडीसी गुंतवणूकदार, की बेरोजगारांसाठी करायची, असेही राम शिंदे यांनी विधानपरिषदेत सांगितलं.
त्यावर कर्जतला एमआयडीसी करण्याबाबत आम्ही सकारात्मक हा नीरव मोदी लंडनला पळून गेलेला की स्थानिक आहे, याची माहिती घेतली जाईल. तसेच, सर्व नावांची चौकशी करू, असे आश्वासन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिले आहे.
दरम्यान, भूनिवड समितीने संबंधित जागेची पाहणी केली आहे. मात्र, जलसंपदा विभागाने इथे पाणीपुरवठा करण्याबाबत ठोस निर्णय घेतलेला नाही. आदी तांत्रिक बाबी तपासून येत्या तीन महिन्यांत निर्णय घेण्यात येईल, असेही मंत्री सामंत यांनी सांगितले. या चर्चेत अरुण लाड, सत्यजित तांबे, सचिन अहीर, शशिकांत शिंदे यांनी सहभाग घेतला.
Edited by - Satish Daud
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.