Nitesh Rane Saam TV
महाराष्ट्र

Sudhakar Badgujar News : शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्याची मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीसोबत पार्टी; नितेश राणेंचा विधानसभेत गंभीर आरोप

Nitesh Rane on Sudhakar Badgujar News : नितेश राणे यांनी अंडरवर्ल्ड डॉन सलीम कुत्तासोबत सुधाकर बडगुजर यांचे संबंध असल्याचा आरोप केल्यानंतर नाशिक पोलीस सतर्क झाले आहे.

प्रविण वाकचौरे

Nagpur News :

शिवसेना ठाकरे गटाचे नाशिक महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांची अडचण वाढण्याची शक्यता आहे. दाऊद गँगचा शार्प शूटर सलीम कुत्तासोबत पार्टी करतानाचा त्यांचा व्हिडीओ समोर आल्याने खळबळ उडाली आहे.

भाजप आमदार नितेश राणे यांनी विधानसभेत या पार्टीचा फोटो सादर केला. तसेच पार्टीचा व्हिडीओ देखील विधानसभा अध्यक्षांकडे दिला आहे. नितेश राणे यांच्या गंभीर आरोपांनंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची एसआयटी चौकशीची घोषणा केली आहे.

सलीम कुत्ता मुंबई बॉम्बस्फोट खटल्यातील मुख्य आरोपी आहे. तो पॅरोलवर बाहेर असताना त्याने एका पार्टीचं आयोजन केलं होतं. या पार्टीत सुधाकर बडगुजर हे देखील सहभागी झाले होते. यावरुन नितेश राणे यांनी गंभीर आरोप केले आणि ठाकरे गटाला घेरण्याचा प्रयत्न केला.

नितेश राणे यांनी अंडरवर्ल्ड डॉन सलीम कुत्तासोबत सुधाकर बडगुजर यांचे संबंध असल्याचा आरोप केल्यानंतर नाशिक पोलीस सतर्क झाले आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

बडगुजर छोटा मासा- दादा भुसे

नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी म्हटलं की, नितेश राणे यांच्या आरोपाची गंभीर दखल घेतली पाहिजे. अतिरेक्यांना पैसा कोण पुरवतो? याचे लागेबांधे कुणाशी आहेत? बडगुजर एक छोटा मासा आहे. याच्यावर कुणाचा वरदहस्त आहे? याची खोलात जाऊन चौकशी करण्याची गरज आहे. (Latest Marathi News)

एसआयटीमार्फत तपास करुन कारवाई करु- फडणवीस

सलीम कुत्ता हा पेरोलवर बाहेर होतो. त्याला पार्टी करण्याचीही परवानगी नाही. त्यामुळे त्याने पार्टी करायची आणि तिथे कुणीतरी जाऊन त्या पार्टीत नाचायचं, हे अतिशय गंभीर आहे. कुत्ताशी या व्यक्तीचा काय संबंध आहे, हे तपासण्यात येईल. पार्टीत कोण कोण सहभागी होतं, या सर्वाची एसआयटी मार्फत तपास होईल. याची सखोल चौकशी होईल आणि योग्य ती कारवाई केली जाईल, असं राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

School Bus Accident : विद्यार्थ्यांनी भरलेल्या बसला अपघात; समोरच्या वाहनाने हुलकावणी दिल्याने बस उलटली, विद्यार्थी जखमी

Today Gold Rate: सोनं खरेदी करण्याची सुवर्णसंधी, १० तोळ्याच्या दरात ६००० रुपयांनी घसरण, आजचे दर किती?

Maharashtra Live News Update: संगमनेरमध्ये स्कूल बसला अपघात

Mumbai Police News : आलिशान कारमधून आले अन् टपरी चालकाला उचलून नेलं, मुंबईतील २ पोलिसांना बेड्या

Maharashtra Politics: मीरा-भाईंदरमध्ये भाजपला मोठा धक्का, मराठी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्याचा मनसेत प्रवेश|VIDEO

SCROLL FOR NEXT