'गावात राहून देणार नाही', भाजप आमदार कुचेंवर धमकीचा गुन्हा दाखल
'गावात राहून देणार नाही', भाजप आमदार कुचेंवर धमकीचा गुन्हा दाखल Saam TV
महाराष्ट्र

'गावात राहून देणार नाही', भाजप आमदार कुचेंवर धमकीचा गुन्हा दाखल

लक्ष्मण सोळुंके

जालना : बदनापूर नगर पंचायतीच्या चार जागांसाठी भाजपच्या उमेदवाराला मतदान करा अन्यथा तुम्हला गावात राहू देणार नसल्याची धमकी देत भाजपा निलंबित आमदार नारायण कुचे यांनी हातात दगड घेऊन धावत धमकी दिल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) कार्यकर्यांनी आणि माजी शिवसेना (Shivsena) आमदार सांबरे यांच्या बंधू भरत सांबरे यांनी केला आहे. या प्रकरणी आमदार नारायण कुचे यांच्या विरोधात बदनापूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून बदनापूर पोलिसांनी या तक्रारीच्या अनुषणगाने आमदार नारायण कुचे आणि त्यांच्या सह अन्य दिघा विरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.

माजी सरपंच हरिकीसन पुजाजी होळकर यांनी बदनापूर पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हंटल आहे की, मी बदनापूर शहराजवळ असलेल्या गणेश बाबा मंदिरात बसलेलो असताना आमदार नारायणन कुचे आणि त्यांच्या सोबत असलेल्या बाबासाहेब कऱ्हाळे, गजानन कऱ्हाळे यांनी हातात दगड घेऊन, भाजपच्या उमेदवाराला मतदान करा, अन्यथा बदनापूर शहरात राहू देणारे नसल्याची धमकी आमदार नारायण कुचे आणि त्यांच्या सोबत असलेल्या दोघांनी दिल्याचं म्हंटल आहे, या तक्रारीवरून बदनापूर पोलिसांनी अदखल पात्र गुन्हा दाखल केला असून या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहे.

दरम्यान या प्रकरणी आमदार नारायण कुचे यांच्याशी संपर्क करण्याचा पर्यन्त केला असता, आपण एका अंतविधीच्या कार्यक्रमात असून हे सर्व आरोप खोटे असल्याचं म्हणतं नगरपंचायत निवडणुकीत विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकल्याने अशा सूडबुद्धीचे राजकारण ते करत असल्याचं म्हणत त्यांनी हे संपूर्ण आरोप फेटाळून लावले आहे.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Met Gala 2024मध्ये सौंदर्यवतींच्या नजाकती, फॅशनवर खिळल्या नजरा

PM Modi In Beed: गोपीनाथ यांच्यासोबत माझं घनिष्ट नातं, PM मोदींकडून मुंडेंच्या आठवणींना उजाळा

EVM हॅक करण्यासाठी सुट्टीवर आलेल्या सैनिकाचा अंबादास दानवेंना फोन; कोण आहे मारूती ढाकणे

Live Breaking News : सोलापुरात भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते पुन्हा आमने-सामने

Ambadas Danve News : अडीच कोटीत Evm हॅक! अंबादास दानवेंना कुणी दिली ऑफर?

SCROLL FOR NEXT