Gevrai Assembly Constituency Saam TV
महाराष्ट्र

Gevrai Assembly Constituency : ना मविआ ना महाविकास आघाडी; लक्ष्मण पवारांचं ठरलं, अपक्षमधून लढणार

Assembly Election in Maharashtra : आमदार लक्ष्मण पवारांचं ठरलं! ना भाजप ना महाविकास आघाडी, अपक्ष निवडणूक लढणार आहेत. कार्यकर्त्यांच्या बैठकीत हा निर्णय घेतला आहे.

Ruchika Jadhav

राज्यात विधानसभा निवडणूकीची रणधुमाळी सुरू आहे. कुणाला किती जागा मिळणार यावरून मविआ आणि महाविकास आघाडीत अद्याप संपूर्ण चित्र स्पष्ट नाही. त्यात आता गेवराई विधानसभा मतदारसंघात पंचरंगी लढत होणार आहे. कारण भाजप आमदार लक्ष्मण पवार यांनी अपक्ष निवडणूक लढणार असल्याचा निर्णय घेतला आहे.

भाजपचे आमदार लक्ष्मण पवार यांनी शुक्रवारी आपला निर्णय जाहीर केला आहे. ना भाजप ना महाविकास आघाडी आपण बीडच्या गेवराई मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवणार आहोत, असा निर्णय त्यांनी कार्यकर्त्यांच्या बैठकीत जाहीर केलाय.

राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वाटेवर असणारे लक्ष्मण पवार हे भाजपचे आमदार आहेत. त्यांनी काही दिवसांपूर्वीच आपल्या कार्यालयावरील भाजपचे चिन्ह काढले आहे. त्यानंतर त्यांनी शरद पवारांची भेट घेतल्याची देखील चर्चा आहे. मात्र गेवराई विधानसभा मतदारसंघाची जागा ही शिवसेना उद्धव ठाकरे गटाला गेली आणि त्या ठिकाणी बदामराव पंडित यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली. यामुळे आता लक्ष्मण पवार यांनी आपला निर्णय बदलला असून आता ते अपक्ष निवडणूक लढवणार आहेत, असं जाहीर केलंय.

त्यामुळे आता एकंदरीत गेवराईमध्ये पंचरंगी लढत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महायुतीकडून विजयसिंह पंडित, महाविकास आघाडीकडून बदामराव पंडित, अपक्ष लक्ष्मण पवार, वंचित बहुजन आघाडीकडून प्रियंका खेडकर, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून मयुरी खेडकर, अशी पंचरंगी लढत होताना दिसणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Uddhav-Raj Thackeray Rally: ठाकरे मराठी माणसांचे 'सुरक्षाकवच'; भाऊकी जोमात, विरोधक कोमात

Gold vs Diamond Mangalsutra: कोणत्या साडीवर कोणतं मंगळसूत्र दिसेल अधिक रेखीव?

Maharashtra Live News Update : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या रोड शो दरम्यान इमारतीवरील टावरला भीषण आग.....

लाडक्या बहिणींनो कमळाला मदत करा, मगच नवऱ्याला जेवण वाढा; भाजपच्या महिला मंत्र्याचा अजब सल्ला

मासिक पाळीच्या वेळी महिलांमध्ये सेक्सची इच्छा का वाढते? तज्ज्ञांनी सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT