jaykumar gore
jaykumar gore  saam tv
महाराष्ट्र

Satara : भाजप आमदार जयकुमार गोरे यांना अखेर कोर्टाकडून जामीन मंजूर; जाणून घ्या काय आहे प्रकरण

ओंकार कदम

Jaykumar Gore News : जमीन फसवणूक प्रकरणी भाजप आमदार जयकुमार गोरे यांना सातारा जिल्हा व सत्र न्यायालयाकडून तात्पुरता दिलासा मिळाला आहे. भाजप आमदार जयकुमार गोरे हे आज जामीनाच्या सुनावणीसाठी सातारा जिल्हा व सत्र न्यायालयात उपस्थित होते. आज सुनावणीत नेमकं काय होणार याची उत्सुकता न्यायालयात परिसरात उपस्थित असलेल्या राजकीय कार्यकर्त्यांना लागली होती. त्यानंतर आज आमदार जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांना सातारा जिल्हा न्यायालयाने तात्पुरता जामीन मंजूर केला आहे.

मायणी येथील जमीन फसवणूक प्रकरणी दहिवडी पोलिस ठाण्यात आमदार जयकुमार गोरे यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. सुप्रीम कोर्टाने आमदार गोरे यांना कोर्टाला शरण जा, असं स्पष्ट केलं होतं. त्यानंतर कोर्टाकडून आमदार जयकुमार गोरे यांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे.

दरम्यान, सातारा जिल्हा न्यायालयाने गुन्ह्यातील तात्पुरता जामीन मंजूर केला आहे. गोरे यांना जामीन मंजूर केल्याने त्यांना ११ ऑगस्टपर्यंत अटकेपासून संरक्षण मिळाले आहे. गोरे यांना जामीन मंजूर झाल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांनाही दिलासा मिळाला आहे. गोरे यांच्यासोबत त्यांचे कार्यकर्ते देखील न्यायालयाच्या आवात उपस्थित होते. दरम्यान, जयकुमार गोरे यांच्यावर बनावट कागदपत्र बनवून मृत व्यक्तीच्या नावे जमीन खरेदी केल्याचा आरोप त्यांच्यावर होता. या प्रकरणी त्यांच्यावर ॲट्रॉसिटी कायद्यान्वये तक्रार दाखल झाली होती. मात्र, या प्रकरणी जयकुमार गोरे तात्पुरता दिलासा मिळाला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

13 लिटरची मोठी इंधन टाकी, स्पोर्टी लूक; Yamaha FZ S Fi दोन नवीन कलर ऑप्शनमध्ये लॉन्च

IPL 2024 SRH vs LSG: पुरन-बिदोनीची नाबाद खेळी; हैदराबादच्या संघासमोर १६६ धावांचे आव्हान

Today's Marathi News Live : छोटे पक्ष निवडणुकीनंतर काँग्रेसमध्ये विलीन होतील का? उद्धव ठाकरे शिवसेनेविषयी काय म्हणाले?

Virar News : महिलेने पोलीस अधिकाऱ्याच्या मनगटाचा घेतला चावा; शिवीगाळ, धक्काबुक्की करत विरारमध्ये मद्यधुंद महिलांचा राडा

Amit Shah News: खिचडी घोटाळा, कलम 370, राम मंदिर; जालन्यात अमित शाह यांचा विरोधकांवर हल्लाबोल

SCROLL FOR NEXT