Gopichand Padalkar On Dhangar Reservation Saam Tv
महाराष्ट्र

Dhangar Reservation: धनगर आरक्षणाचा मुद्दा पेटणार, भाजप आमदारानेच सरकारला दिला अल्टिमेटम

Satish Kengar

>> विजय पाटील

Gopichand Padalkar On Dhangar Reservation:

'धनगर आरक्षण राज्य सरकार देऊ शकतं. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना पत्र दिलं आहे. आरक्षण न मिळाल्यास 29 दिवसांत धनगर समाज पुन्हा रस्त्यावर उतरले', धनगर समाजासाठी आरक्षणाची मागणी करत भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी घरचा आहेर देत सरकारला अल्टिमेटम दिला आहे.

आज गोपीचंद पडळरांचा दसरा मेळावा सांगलीच्या कवठेमहांकाळ तालुक्यातील आरेवाडीच्या बनात पार पडला. यात मोठ्या संख्येने धनगर समाजातील लोकांनी गर्दी केली होती. यावेळी बोलताना पडळकर यांनी सरकाराला हे अल्टिमेटम दिले आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पडळकर म्हणाले आहेत की, 'सरकारला माझा अल्टिमेटम आहे. तुम्ही काहीही करा आणि धनगर समाजातील लोकांना एसटीचा दाखल हातात द्या.' ते म्हणाले, 'कुणीही कितीही राजकारण केले तरी, धनगर त्याला बळी पडणार नाही. मराठा आणि धनगर हे मोठे समाज आहेत. गरज पडेल तेथे बाळू मामा आणि गरज पडेल तर बापू बिरू वाटेगावकर व्हायचं.'

पडळकर म्हणाले, महाराष्ट्रामध्ये चळवळ उभा केली होती, बहुजनांना एक करण्याची. पण त्यांना माहित आहे बहुजन एक झाले, तर महाराष्ट्रामध्ये काय होऊ शकतं. म्हणून समता परिषदेला दाबायचा प्रयत्न झाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे तुकडे-तुकडे केले.' ते म्हणाले, 'गोपीनाथ मुंडे हे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले असते. मुंडे यांना मुख्यमंत्रीपदापासून वंचित ठेवण्यात आले.' (Latest Marathi News)

दरम्यान, या मेळाव्यासाठी महाराष्ट्रसह कर्नाटक राज्यातून धनगर बांधवांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली आहे. तर धनगर आरक्षण अंमलबजावणीसह अन्य समाजातील आरक्षण मागणी बाबत आमदार पडळकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rashi Bhavishya Today : श्री महालक्ष्मीची कृपा होणार, 'या' ६ राशीच्या व्यक्तींचे नशीब फळफळणार; वाचा तुमचे राशिभविष्य

Horoscope Today : गुंतवणुकीसाठी योग्य दिवस, मोठा फायदा होण्याची शक्यता; वाचा आजचे तुमचे राशीभविष्य

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

SCROLL FOR NEXT