Gopichand Padalkar Apologizes Maharashtra Assembly Ruckus Saamtv
महाराष्ट्र

Awhad-Padalkar Activists Clash: अत्यंत दुर्दैवी, मला दुःख होतंय; हाणामारीच्या घटनेनंतर पडळकरांकडून दिलगिरी

Gopichand Padalkar Apologizes Maharashtra Assembly Ruckus : विधानभवनात झालेल्या हाणामारीच्या घटनेनंतर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिलगिरी व्यक्त केलीय.

Bharat Jadhav

विधानभवनातील हाणामारीच्या घटनेनंतर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिलगिरी व्यक्त केलीय. घडलेली घटना दुर्दैवी आहे. विधानसभेच्या परिसरात जी घटना घडलीय, ती अत्यंत दुर्दैवी आहे. विधानसभेचा एक सदस्य म्हणून मी दिलगिरी व्यक्त करतो, त्या घटनेचा मला दु:ख होतंय. विधानसभा अध्यक्षांकडे दिलगिरी व्यक्त करतो. असं गोपीचंद पडळकर म्हणाले. (BJP MLA Gopichand Padalkar expresses sorrow over Assembly chaos, seeks apology from Speaker)

भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यामध्ये बुधवारी जोरदार वाद झाला होता. दोन्ही नेत्यांनी एकमेकांना शिवीगाळ देखील केली होती. त्यानंतर आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते विधानभवनाच्या लॉबीमध्ये भिडले. पडळकरांच्या कार्यकर्त्यांनी जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्याला मारहाण केलीय. त्यानंतर आव्हाड यांनी माध्यमांशी प्रतिक्रिया देताना संताप व्यक्त केला. हाणामारीच्या घटनेनंतर गोपीचंद पडळकर यांनी माध्यमांशी संवाद साधत घडलेल्या प्रकरणाविषयी दिलगिरी व्यक्त करत असल्याचं म्हटलंय.

विधानसभेच्या परिसरात जी घटना घडलेली आहे,ती अत्यंत दुर्दैवी आहे. याचे तीव्र दु:ख विधानसभेच्या सदस्य म्हणून मला होतंय. मी महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि सभापती हा परिसर त्यांच्या अंतर्गत असल्यानं मी दिलगिरी व्यक्त करतो. तसेच याविषयी मी आमचे सर्व नेते मंडळीशी चर्चा करतो, अशी प्रतिक्रिया गोपीचंद पडळकर यांनी दिलीय. त्याआधी पडळकर यांनी मारहाण करणारा आपलाच कार्यकर्ता असल्याचं माध्यमांना हसत हसत सांगितलं होतं.

पडळकरला मी मारणारच - नितीन देशमुखचा इशारा

विधानभवनाच्या लॉबीमध्ये जितेंद्र आव्हाड आणि गोपिचंद पडळकर यांचे कार्यकर्ते आपसात भिडले. पडळकरांच्या कार्यकर्त्यांनी शरद पवार गट राष्ट्रवादीचे कार्यकर्ते नितीन देशमुख यांना मारहाण केली. नितीन देशमुख हे राष्ट्रवादीत १५ वर्षापासून आहेत. दरम्यान नितीन देशमुख यांनी गोपीचंद पडळकर यांना इशार दिलाय. मी पडळकरला मारणारच. त्याला त्याची मस्ती दाखवणार असा इशारा दिला.

विधानभवनातील हाणामारीनंतर आव्हाड संतापले

हाणामारीच्या घटनेनंतर शरद पवार गट राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड संतपाले. विधिमंडळातच आमदार सुरक्षित नाहीत. तर आमदार कशाला राहायचं? असा संतप्त सवाल त्यांनी केलाय. महाराष्ट्राला समजलं की पडळकरांच्या लोकांनी हल्ला केला. आम्हाला यापेक्षा जास्त कोणताही पुरावा द्यायचा नाही.

तुम्ही विधानपरिषदेत गुंडांना प्रवेश देणार असाल आणि ते आमच्यावर हल्ले करत असतील तर आम्ही सुरक्षित नाहीत, असा त्याचा अर्थ होतो. मी सुरक्षित नसल्याचे ट्वीट अगोदरच केलेले आहे. मला आई-बहिणीवर शिव्या देण्यात आल्या. तुला मारून टाकू अशी धमकी देण्यात आल्याचं आव्हाड म्हणालेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yogesh Kadam : आधी पुण्यातील गुन्हेगारीचा आलेख वाचला; नंतर गृहराज्यमंत्र्यांनी गुन्हे रोखण्याचा सरकारचा 'राणबाण उपाय'च सांगितला

Akola Shocking : दिवसभर ५ वर्षांचा चिमुकला बेपत्ता, नंतर सांडपाण्याकडे लक्ष गेलं; दृश्य पाहून कुटुंब हादरलं

Raj Thackeray : महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री हिंदीसाठी का भांडतोय? राज ठाकरेंचा थेट सवाल

Raj Thackeray : 'मुंबईतल्या समुद्रात डुबे डुबे के मारेंगे'; राज ठाकरेंची भाजप खासदार निशिकांत दुबेंना वार्निंग

Ganapati Special Trains : चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी, गणेशोत्सवानिमित्ताने मध्य रेल्वे चालवणार २५० विशेष गाड्या

SCROLL FOR NEXT