BJP Mla devyani farande slams Shiv sena gulabrao patil and Uday Samant maharashtra assembly monsoon session 2023 Live updates  Saam TV
महाराष्ट्र

Maharashtra Politics: भाजपच्या महिला आमदाराने शिंदे गटातील आमदारांना झापलं; पावसाळी अधिवेशनात काय घडलं? वाचा...

साम टिव्ही ब्युरो

Maharashtra Assembly Monsoon Session 2023: महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज सातवा दिवस आहे. विधिमंडळाच्या अधिवेशानाचा सहावा दिवस विरोधकांनी गाजवला होता. विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन करत विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलं होतं.

याशिवाय कर्जत-जामखेड मतदारसंघाचे राष्ट्रवाचे आमदार रोहित पवार यांनी आंदोलनही केलं होतं. दरम्यान, सातव्या दिवशी सभागृहात भाजपच्या महिला आमदार आणि शिंदे गटातील दोन बड्या नेत्यांमध्ये चांगलीच खडाजंगी पाहायला मिळाली.

एका लक्षवेधीवरून भाजपच्या महिला आमदार देवयानी फरांदे आणि पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांच्यात खडाजंगी पाहायला मिळाली. गुलाबराव पाटील यांनी लक्षवेधीवरून फरांदे यांना डिवचण्याचा प्रयत्न केला.

त्यात चिडलेल्या फरांदे यांनी अध्यक्ष महोदय... जे वाचत नाही आणि बोलतात ना... त्यांना जरा शिकवा... अशा शब्दात गुलाबराव पाटलांना सभागृहात उत्तर दिलं. भाजप आणि शिवसेना आमदारांमध्ये चाललेल्या या खडाजंगीमुळे सभागृहात सन्नाटा पसरला होता.

नेमकं काय घडलं?

भाजप आमदार देवयानी फरांदे यांनी विधानसभेत लक्षवेधी (Maharashtra Politics) सूचना उपस्थित केली. लोकप्रतिनिधींच्‍या निधीतून महानगरपालिका क्षेत्रात बांधण्‍यात येणार्‍या व्‍यायायशाळा, अभ्‍यासिका, आदी वास्‍तू सेवाभावी वृत्तीने चालवल्‍या जातात. त्‍यांना व्‍यावसायिक दराने भाडे आकारणी केली जाते. या भाडे आकारणीमध्‍ये कपात करण्‍याची मागणी त्यांनी केली.

दरम्यान, देवयानी फरांदे यांनी मांडलेल्या लक्षवेधीवर बऱ्याच वेळ चर्चा झाली. त्यांच्या लक्षवेधीला मंत्री उदय सामंत यांनी उत्तर दिलं. मात्र, फरांदे यांनी यावर हरकत घेतली. अशातच उदय सामंत (Uday Samant) यांच्या मदतीसाठी गुलाबराव पाटील आले.

अध्यक्ष महाराज सर्व मंत्री तयारी करुन येतात. मात्र एकाच लक्षवेधीवर इतकी चर्चा झाली तर अन्य विषयांवर अन्याय होतो, असं म्हणत गुलाबराव पाटलांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. यावर देवयानी फरांदे भडकल्या.

अध्यक्ष महोदय मी इतक्या पोटतिडकीने बोलतेय. मी राज्याची लक्षवेधी मांडली आहे, काय चाललयं हे, जे वाचत नाही आणि बोलतात ना, त्यांना जरा शिकवा, असं म्हणत फरांदे यांनी संताप व्यक्त केला.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today Horoscope : जुना अबोला मिटेल,घरात उत्साहाचे वातावरण राहील; वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today : आज विनाकारण शत्रुत्व ओढवून घ्याल, दानधर्मासाठी खर्च कराल; वाचा तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय?

Fact Check : गणपतीसारख्या दिसणाऱ्या बाळाचा जन्म? काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य?

Maharashtra Politics: महायुतीचं बेताल त्रिकूट; देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याला नेत्यांकडून हरताळ

Save Mangroves : कांदळवन सुरक्षेसाठी १२० कोटी; १९५ ठिकाणं, ६६९ CCTV कॅमेरे, सरकारचा प्लान की पांढरा हत्ती?

SCROLL FOR NEXT