Nitesh Rane On Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंना मच्छरही घाबरत नाही, सामनाच्या मुलाखतीवर नितेश राणेंची टीका

Maharashtra Politics: सामनाच्या आवाज कुणाचा पॉडकास्टमध्ये संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली आहे. यावर भाजपचे आमदार नितेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
 Shivsena Podcast
Shivsena Podcastsaam tv
Published On

Nitesh Rane criticizes Uddhav Thackeray: सामनाच्या आवाज कुणाचा पॉडकास्टमध्ये संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली आहे. या मुलाखतीचा टीझर नुकताच शेअर करण्यात आला आहे. वर्षातील सर्वात मोठी आणि प्रखर मुलाखत असल्याचे या पोस्टमध्ये म्हटले आहे. यावर भाजपचे आमदार नितेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. उद्धव ठाकरेंना मच्छरही घाबरत नाही अशी टीका राणेंनी या मुलाखतीवर केली आहे.

नितेश राणे म्हणाले, उद्यापासून हास्यजत्रेचा महाएपिसोड येणार आहे. महाराष्ट्राचा कुंटुंबप्रमुख असं ते बोलले, यावर माझा आक्षेप आहे. आम्ही शिवरायांना कुंटुब प्रमुख मानतो. त्यामुळे त्यांनी महाराष्ट्राची माफी मागावी अशी मागणी देखील राणेंनी केली आहे. ते म्हणाले, मुख्यमंत्री होते तेव्हा गळ्याला पटटा लावून स्वतःचे खिसे भरले. दुसऱ्यांना खेकडे बोलता, पण पाय खेचण्याचे काम उद्धव ठाकरेंनी केले आहे. त्यात त्यांनी पीएचडी केली आहे. (Tajya Marathi Batmya)

 Shivsena Podcast
BJP Parliamentary Meeting: विरोधेकांच्या 'INDIA' वर PM मोदीची पहिली प्रतिक्रिया, ईस्ट इंडियासोबत केली तुलना

"हिंमत असेल तर नितेश राणेंना इंटरव्ह्यू द्या"

राणे म्हणाले, उद्धव ठाकरेंना मच्छरही घाबरत नाही. हिंमत असेल तर नितेश राणेंना इंटरव्ह्यू घेऊ द्या, मातोश्रीत जाऊन इंटरव्ह्यू घेतो. बाबरी जेव्हा पाडली तेव्हा उद्धव ठाकरे हे मातोश्रीच्या एका खोलीत कॅमेरा साफ करत होते. माझ्याकडे पुरावे आहेत. उद्धव ठाकरे हे बाळासाहेब यांच्या विचारांना कलंक आहेत, अशी टीका नितेश राणे यांनी केली आहे. (Latest Political News)

 Shivsena Podcast
Maharashtra Political Crisis: सत्तासंघर्ष प्रकरणात मोठी अपडेट! ४० आमदारांनी नोटीसीला उत्तर देण्यासाठी मागितली मुदतवाढ

"सगळ्यात मोठा चोर हा मातोश्रीत"

नितेश राणे म्हणाले, उबाठाची एवढी अधोगती झाली आहे की अण्णा हजारे यांनी मशाल हातात घ्यावी असे म्हणण्याचे दिवस आले आहेत. बाळासाहेब अण्णा हजारे यांच्यावर वाकड्या तोंडाचा गांधी अशी टीका करायचे आणि आता मशाल घ्या अशी मागणी सामनातून करायला लागते. हेच उद्धव ठाकरेंनी आयुष्यात काय कमावलं याचं उदाहरण आहे. अण्णा हजारे यांना मशाल पेटवायची असेल, उपोषण करायचे असेल तर त्यांनी मातोश्रीच्या समोर जाऊन करावं. कारण सगळ्यात मोठा चोर हा मातोश्रीत आहे, असे देखील ते म्हणाले. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com