Vinod tawde Saam Tv
महाराष्ट्र

Vinod Tawde: राष्ट्रीय राजकारणात विनोद तावडेंचा जोरदार कमबॅक; मोदी- शहांनी सोपवली 'ही' महत्वाची जबाबदारी

पक्षश्रेष्ठींनी दाखवलेल्या विश्वासानंतर आता राष्ट्रीय राजकारणात विनोद तावडेंचं वजन वाढल्याचे दिसत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

गेल्या काही वर्षांपासून राष्ट्रीय राजकारणात असलेले भाजप नेते विनोद तावडे (Vinod Tawde) यांचे राजकीय वजन चांगलेच वाढले आहे. कारण, आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विनोद तावडे यांच्यावर भाजपकडून महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. भाजपकडून लोकसभा निवडणुकांची रणनीती आखण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती लोकसभा निवडणुकीपूर्वी प्रत्येक राज्याचा आढावा घेऊन रणनीती निश्चित करणार आहे.

विनोद तावडे हे एकेकाळी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांचे प्रतिस्पर्धी मानले जायचे. 2019 मध्ये विधान सभेचं पक्षाने तिकीट नाकारल्याने काही काळासाठी ते राजकारणातून बाजूला झाल्याचे बोलले जात होते. मात्र तावडेंनी पक्षात पुन्हा एकदा जोरदार पुनरागमन केले आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पायाभूत रणनीतीसाठी समितीचे निमंत्रक म्हणून विनोद तावडे, सुनील बन्सल आणि तरुण चुग यांच्यावर केंद्र आणि राज्य पातळीवरील नेत्यांचे कार्यक्रम आणि ज्या ठिकाणी भाजप दुसऱ्या क्रमांकावर आहे तिथे उमेदवार ठरवण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

दरम्यान, विनोद तावडे यांनी फडणवीस सरकारमध्ये शालेय शिक्षण, वैद्यकीय आणि उच्च तंत्रशिक्षण, क्रीडा, संस्कृती आणि मराठी भाषा अशी महत्त्वाची खाती विनोद तावडे सांभाळली. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत शेवटच्या क्षणी त्यांचे तिकीट कापण्यात आले. ज्यामुळे त्यांच्या राजकीय कारकिर्दीचा शेवट झाल्याच्याही चर्चा रंगल्या होत्या. मात्र आता पुन्हा विनोद तावडेंनी राजकारणात जोरदार कमबॅक केले आहे. (Maharashtra Politics)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Assembly Election: साकोलीचं महाभारत ! जातीय समीकरण कुणाच्या पथ्यावर? पटोलेंपुढे अविनाश ब्राह्मणकरांचं आव्हान

Horoscope Today : काहींना नको असलेल्या गोष्टींचा होईल त्रास, तर कोणाचे शत्रू काढतील डोके वर, वाचा तुमचे आजचे राशिभविष्य

Horoscope: कुंभ राशीचं करिअर, लव्ह लाईफ आणि आरोग्याच्या दृष्टीने कसा असेल आजचा दिवस; वाचा आजचे राशीभविष्य

Baramati Assembly: बारामतीचा पुतण्या पडणार? अजित पवार की युगेंद्र पवार? बारामतीकरांचा कौल कुणाला?

Assembly Election: बाळासाहेबांच्या पुण्यतिथीला पोस्टर वॉर; दोन्ही शिवसेनेचा एकमेकांवर प्रहार

SCROLL FOR NEXT