Radhakrishna Vikhe Patil News  Saam Tv
महाराष्ट्र

Radhakrishna Vikhe Patil : 'संजय राऊत हवापालट करून आले, मात्र उपयोग झाला नाही'

महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी लोकपाल कायद्यावरील टीकेवरून शिवसेना ठाकरे गट खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

साम टिव्ही ब्युरो

सचिन बनसोडे

Radhakrishna Vikhe Patil News : महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी लोकपाल कायद्यावरील टीकेवरून शिवसेना ठाकरे गट खासदार संजय राऊत यांनी केलेल्या टीकेला जोरदार टीका केली आहे. 'संजय राऊत मधल्या काळात हवापालट करून आले होते, त्याचा उपयोग झाला नसल्याचं दिसून येत आहे, अशी टीका महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला आहे. (Latest Marathi News)

संजय राऊत (Sanjay Raut) यांनी लोकपाल कायद्याच्या अनुषंगाने केलेल्या टीकेला महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रतिउत्तर दिले आहे. संजय राऊत मधल्या काळात हवापालट करून आले होते. त्याचा उपयोग झाला नसल्याचं दिसून येत आहे. संजय राऊत यांनी बोलताना भान ठेवावे, अशी प्रतिक्रिया विखे पटलांनी दिली आहे. तसेच राज्यात अनेक विकासकाची कामे सुरू असताना माध्यमांनी संजय राऊतांसारख्या मुक्त फळे उधळणाऱ्या लोकांना महत्व देऊ नये असेही विखे पाटील म्हणाले.

दरम्यान, लंपी आजाराच्या काळामध्ये शासकीय पशुवैद्यकीय सेवा कमी पडली असून भविष्यामध्ये शासकीय महाविद्यालय सुरू करण्याचा प्रयत्न राज्य सरकार करणार करणार असल्याचे राज्याचे दुग्ध व पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी सांगितले. ज्या लोकांना खाजगी पशुवैद्यकीय महाविद्यालय सुरू करायचे असेल त्यांनी परवानगी मागितली तर त्यांनाही परवानगी दिली जाईल, अशी माहिती मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज नगरमध्ये बोलताना दिली आहे.

काय म्हणाले होते संजय राऊत ?

संजय राऊत म्हणाले, लोकायुक्तांच्या कक्षेतून राज्याच्या मुख्यमंत्र्यांची चौकशी गुप्त रीतीने होईल असे सांगण्यात येत आहे. ही चौकशी गुप्त का? खुली चौकशी करा. मग तुम्हाला दूध का दूध पानी का पानी हे कळेल. मुख्यमंत्र्यावरील आरोप गंभीर आहेत. अनेक यंत्रणाकडे त्यांच्या विरोधात पुरावे आहेत'.

'१० कोटींचे भूखंड आपल्या मर्जीतल्यांना २ कोटींना दिले. गोरगरिब आणि झोपट्टीधारकांचे १६ भूखंड होते. या साऱ्या प्रकारावर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे गप्प का, असा प्रश्न राऊतांनी उपस्थित केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident: हुल्लडबाज ट्रक ड्रायव्हरचा धोकादायक ओव्हरटेक, थरकाप उडवणारा VIDEO व्हायरल

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसची महत्वाची बैठक, राज्यसभेचा उमेदवार ठरणार?

मोठी बातमी! परीक्षेच्या काही मिनिटांआधी MSc नर्सिंगची परीक्षा रद्द, अचानक नेमकं काय घडलं?

कौटुंबिक वाद शिगेला पोहोचला, संतापलेल्या पत्नीनं नवऱ्याला 'नको तेथे मारलं', अन्...; मुंगेरमधील धक्कादायक घटना

राज्यसभेसाठी राष्ट्रवादीकडून नवनीत राणांना उमेदवारी? तटकरेंनी एका वाक्यात विषय संपवला

SCROLL FOR NEXT