मंकावती तीर्थकुंड, तुळजापूर. 
महाराष्ट्र

तीर्थकुंड हडपणाऱ्या भाजपनेत्याला सेनेच्या मंत्र्यांचा आधार!

साम टीव्ही ब्युरो

कैलास चौधरी

उस्मानाबाद ः तुळजापूरची तुळजा भवानी हे अवघ्या महाराष्ट्राचे अराध्य दैवत आहे. देवीच्या दर्शनासाठी प्रत्येक भाविक वर्षातून एकदा का होईना जातोच. तेथील प्रत्येक जागा त्याच्यासाठी पवित्र आहे. मात्र, तेथील एक पुरातन तीर्थकुंड भाजप नेत्याने हडपले आहे. हे कुंड वारसाहक्काने आल्याचा त्या महाशयांचा दावा आहे.

पुराणात उल्लेख असलेले हे तीर्थकुंड खासगी कसे काय होऊ शकते, असा भाविकांचा सवाल आहे. भाजपनेत्याच्या या अजब दाव्याला शिवसेनेच्या मंत्र्यांनी पाठबळ दिलेय. त्यामुळे भाविकांत प्रचंड नाराजी आहे.BJP leader's claim on Mankavati shrine in Tuljapur

मंकावती तीर्थकुंड पुराणकाळातील

तुळजा भवानी मंदिरासमोरील परिसरात तब्बल 1 हजार 244 चौरस मीटर आकाराचे मंकावती कुंड आहे. या कुंडाची महती स्कंद पुराणात आहे. तुळजाई महात्म्य व देविविजय पुराणातही या कुंडाचा उल्लेख सापडतो. या कुंडावर पूर्वी भाविक स्नानासाठी जात. परंतु नंतरच्या काळात हे कुंड खासगी असल्याचा दावा भाजप नेते देवानंद रोचकरी यांनी केला आहे. त्यामुळे तेथे कोणी स्नानासाठी जात नाही. त्या परिसरात रोचकरी यांनी खासगी बांधकामही केलंय.

जिल्हाधिकाऱ्यांचे होते फौजदारीचे आदेश

याबाबत स्थानिक व भाविकांनी आवाज उठविल्यानंतर जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी लक्ष घातले. आणि हे कुंड हडपणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा आदेश दिला होता. त्यासाठी त्रिसदस्यीय समिती नेमल्याचे सांगितले जाते. या आदेशाला नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी स्थगिती दिलीय. तुळजापूर येथील प्राचीन मंकावती तीर्थकुंड परिसरातील लोकांनी हडप केला होते. या प्रकरणी भाजपा नेते देवानंद रोचकरी यांचं नाव पुढे आलं होतं. तुळजापूर परिसरात दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे. भाजप नेत्याला शिवसेनेच्या मंत्र्यांनी कशी काय साथ मिळू शकते, याविषयी उलटसुलट चर्चा सुरू आहे.

रोचकरींचे काय म्हणणं आहे

या प्रकरणाविषयी भाजप नेते देवानंद रोचकरी म्हणतात, या प्रकरणात जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश देताना नियमांचे पालन केलेले नाही. आदेश देण्यापूर्वी त्यांनी कायदेशीररित्या नोटीस देणे आवश्यक होते. आपल्याला कोणत्याही प्रकारची नोटीस न देता व म्हणणे न ऐकून घेता निकाल दिला आहे. हे मंत्री महोदयांना पटले. त्यावरून ही स्थगिती दिलीय. या प्रकरणी आता नगर विकास मंत्र्यांकडे सुनावणी होणार आहे. BJP leader's claim on Mankavati shrine in Tuljapur

तीर्थकुंड वारसा हक्काने आलंय

मंकावती कुंड हे आजोबांचे आजोबा मूळ मालक शेटीबा मंकावतीराव रोचकरी यांच्या मालकीचे होते. ते वारसा हक्काने आपल्याकडे आले आहे. ते वडिलोपार्जित असल्याचा लेखी दावा मंत्र्यांकडे केला आहे. तसेच या प्राचीन कुंडाची नोंद त्यांच्या नावावर घ्यावी, अशी मागणी रोचकरी यांनी केली आहे. पुराणातील वास्तू अशी वारसा हक्काने मिळते का, त्यावर बांधकाम करता येते का, याविषयी चर्वितचर्वण सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: छगन भुजबळांच्या विजयाचा मोठा जल्लोष; जेसीबीतून फुलांचा वर्षाव

Longest River In Maharashtra: महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती? पवित्र तीर्थस्थान म्हणून ओळख

Vidhan Sabha Election Result : रायगड जिल्ह्यात महायुतीची सरशी; महाविकास आघाडीच्या हाती भोपळा

Maharashtra Election Result: उल्हासनगरात राष्ट्रवादीला जबर धक्का! भाजपच्या कुमार आयलानींचा मोठा विजय

Sunil Tatkare: खरी राष्ट्रवादी कोणती? अखेर जनतेनं उत्तर दिलचं, सुनिल तटकरेची प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT