...म्हणून मुख्यमंत्र्यांना वर्षा बंगला भरेल एवढी पत्र पाठवणार - चंद्रशेखर बावनकुळे
...म्हणून मुख्यमंत्र्यांना वर्षा बंगला भरेल एवढी पत्र पाठवणार - चंद्रशेखर बावनकुळे Saam TV
महाराष्ट्र

...म्हणून मुख्यमंत्र्यांना वर्षा बंगला भरेल एवढी पत्र पाठवणार - चंद्रशेखर बावनकुळे

अरुण जोशी

अमरावती : केंद्रीय मंत्री नारायण राणेNarayan Rane यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेUddhav Thackeray यांच्या बद्दल आक्षेपार्ह विधान केल्यानंतर शिवसेनच्याShivsena कार्यकर्त्यांनी अमरावती येथील भाजप कार्यालयावरBJP Office हल्ला केला होता यावेळी भाजपा कार्यालयाची तोडफोड करत ते जाळण्याचाध्दा प्रयत्न केला होता. या घटनेबद्दल या तोडफोडी मध्ये सामील असणाऱ्या शिवसैनिकांना तातडीने अटक करण्याची मागणी भाजपने केली आहे आणि जर या शिवसैनिकांना अटक केली नाही तर मात्र अमरावतीमध्ये मोठं आंदोलन केले जाईल अशी माहिती भाजप नेते व माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळेChandrashekhar Bavankule यांनी दिली.BJP leader will send letter to the Chief Minister to fill the bungalow

हे देखील पहा-

तसेच यापुढे जर शिवसेनेकडून भाजप कार्यालयावर हल्ला केला तर 'इठ का जबाब फत्तर से देंगे' असा इशाराही चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला आहे.बावनकुळे यांनी अमरावती पोलीस आयुक्त आरती सिंग यांची भेट घेऊन शिवसैनिकांना अटक करण्याची मागणी केली आणि पोलीस Police आयुक्तालयासमोर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व राज्य सरकारState Goverment विरोधात जोरदार घोषणाबाजीही यावेळी भाजपाकडून करण्यात आली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देशाचा स्वातंत्र महोत्सव माहिती नाही आणि तो त्यांना माहित व्हावा यासाठी वर्षा बंगला भरेल इतके पत्र पाठवणार असल्याचेही भाजप नेते चन्द्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले आणि अमरावती येथून आज स्वतः चंद्रशेखर बावनकुळे यांनी पोस्ट ऑफिस मध्ये पत्र टाकत या मोहिमेला सुरवातही केली.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी चुकूनही करू नका 'हे' काम; नाहीतर येतील आर्थिक अडचणी

Maruti Suzuki च्या या कारवर मिळत आहे 58000 रुपयांची सूट, 34kmpl चा देते मायलेज

iQOO Neo 9s Pro जबरदस्त प्रोसेसरसह भारतात होणार लॉन्च, मिळणार जबरदस्त फीचर्स; जाणून घ्या संपूर्ण माहिती

Maharashtra Politics: सत्तेसाठी भाजप आणि काँग्रेसचा छुपा समझौता, सुजात आंबेडकरांचा आरोप

Beed News: 3 वर्ष महाविकास आघाडीच्या सरकारने रेल्वेचा पावणेचारशे कोटींचा निधी अडवला, प्रीतम मुंडेंचा गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT