Sanjay Raut- Pravin Darekar Saam TV
महाराष्ट्र

कुठलाही घोडेबाजार भाजपला करायचा नाही, प्रविण दरेकरांचा राऊतांवर पलटवार

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केलीय.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सुशांत सावंत

मुंबई : राज्यसभा निवडणुकीचे (Rajyasabha election) बिगुल वाजल्यानंतर महाविकास आघाडीसह इतर विरोधी पक्षांनी आपआपले उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहेत. राज्यसभेची सहावी जागा जिंकण्यासाठी तर सर्वच पक्षांच्या नेत्यांची रस्सीखेच सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राज्यसभा निवडणुकीत घोडेबाजार करण्याचा कोणी प्रयत्न करु नका. जसे केंद्राकडून तुमचे लक्ष असते तसे महाराष्ट्राच्या गृहखात्याचे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav Thackeray) यांचेही लक्ष आहे, असा इशारा आमदारांसह भाजपला दिला होता. यावर आता विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांनी पटलवार केला आहे.

कुठलाही घोडेबाजार भाजपला करायचा नाही. जो आमदार तीन लाख लोकांचे प्रतिनिधित्व करतो, त्याच्याबद्दल असे वक्तव्य करणे म्हणजे मतदारांचा अपमान आहे. कुणाचे घोडे विकले जात असतील तर संजय यांनी आपला अर्ज मागे घ्यावा.आता कोणत्या संजयने उमेदवारी अर्ज मागे घ्यावा हे त्यांनी ठरवावे, अशी खोचक टीका दरेकरांनी नाव न घेता संजय राऊतांवर केली आहे.

राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रविण दरेकर माध्यमांशी बोलताना म्हणाले, भाजपला कुठलाही घोडेबाजार करायचा नाही. जो आमदार तीन लाख लोकांचे प्रतिनिधित्व करतो, त्याच्याबद्दल असे वक्तव्य करणे म्हणजे मतदारांचा अपमान आहे. कुणाचे घोडे विकले जात असतील तर संजय यांनी आपला अर्ज मागे घ्यावा.आता कोणत्या संजयने उमेदवारी अर्ज मागे घ्यावा, हे त्यांनी ठरवावे. आम्ही आमचा उमेदवार निवडून आणू. आयात निर्यातीची गप्पा मारणारऱ्यांनी आयात केलेल्यांना मंत्रिपद दिले.

मुख्यमंत्र्यांच्या २५ वर्षांबाबत केलेल्या वक्तव्याचाही दरेकरांनी समाचार घेतला. यावेळी ते म्हणाले, कालच सुप्रिया सुळे यांनी नवस केला आहे. त्यामुळे आयातीच्या गप्पा मारणाऱ्यांनी आधी आपला विचार करावा, असा टोलाही त्यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना लगावला आहे. तसंच संभाजीराजे छत्रपती यांच्याबाबत बोलताना दरेकर म्हणाले, संभाजी राजेंना ज्या पद्धतीने फसवलं त्यामुळे जनता नाराज आहे.त्याची किंमत तुम्हाला मोजावी लागणार आहे, असा इशारा त्यांनी महाविकास आघाडी सरकारला दिला.

Edited By - Naresh Shende

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

DMRC Recruitment: मेट्रोत नोकरीची संधी; पात्रता १२वी पास; आजच करा अर्ज

सोनं खरेदीदारांसाठी सुवर्णयोग; १० तोळं सोनं १९ हजारांनी स्वस्त, चांदीच्या भावातही कमालीची घट

Maharashtra Live News Update: नांदेड जिल्ह्यात मुसळधार पावसाला सुरुवात, अनेक नदी नाल्यांना पूर

Vande Bharat Express : नांदेडमधून आणखी एक वंदे भारत, पुण्याला फक्त ७ तासात; कुठे कुठे थांबणार, तिकिट किती? वाचा A टू Z माहिती

Nilesh Ghaiwal: ३ वर्षांत ५८ एकर जमीन खरेदी, कोट्यवधी रुपयांची उलाढाल; निलेश घायवळ प्रकरणात ईडीची एन्ट्री?

SCROLL FOR NEXT