Pravin darekar And Hitendra Thakur saam tv
महाराष्ट्र

विधानपरिषद निवडणूक 2022 : प्रविण दरेकर- हितेंद्र ठाकूर यांच्यात बंद दाराआड खलबतं

भाजप नेत्यांमध्ये आणि बविआच्या आमदारांमध्ये विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी बंद दाराआड चर्चा झाली.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : राज्यसभेच्या निवडणुकीत सहा जागांसाठी महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) आणि भारतीय जनता पक्षामध्ये चुरशीची लढत झाली. अपक्ष आमदारांची मते आपल्या बाजुनं फिरवून सहाव्या जागेसाठीचे उमेदवार धनंजय महाडीक (Dhananjay Mahadik) यांचा भाजपच्या रणनीतीमुळं विजय झाला. एकीकडे राज्यसभेतील भाजपच्या विजयाचा धुरळा राजकीय मैदानात उडाला असतानाच दुसरीकडे (vidhan Parishad election) विधान परिषदेच्या निवडणुकीसाठीही भाजपने (BJP) मोट बांधायला सुरुवात केलीय.

येत्या २० जूनला १० जागांसाठी विधान परिषदेची निवडणूक होत आहे. त्यामुळे महाविकास आघाडीसह भाजपने घोडेबाजार होऊ नये म्हणून आमदारांची हॉटेलवारी केली आहे. या निवडणुकीत अपक्ष आणि छोट्या पक्षांच्या आमदारांचे मतदान अंत्यंत महत्वाचे मानले जात आहे. तसेच बहुजन विकास आघाडीच्या तीन आमदारांच्या मतदानाकडेही सर्वच पक्षांचे लक्ष लागले आहे.

भाजपकडून पाचव्या जागेसाठी प्रसाद लाड यांना विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी देण्यात आलीय. तर लाड यांच्या विरोधात कॉंग्रेसचे उमेदवार भाई जगताप हे निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे मतांचा कोटा भरण्यासाठी बविआच्या तीन आमदारांची मतांना अनन्य साधारण महत्व प्राप्त झाले आहे. याच पार्श्वभूमीवर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) आणि माजी मंत्री गिरीश महाजन आमदार (Hitendra Thakur) हिंतेंद्र ठाकूर यांच्या भेटीसाठी विरार मध्ये दाखल झाले आहेत.

भाजप नेत्यांमध्ये आणि बविआच्या आमदारांमध्ये बंद दाराआड खलबलं झाली. विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपला मतदान करावे, अशी मागणी हिंतेद्र ठाकूर यांच्याकडे भाजप नेत्यांनी केली आहे. तसेच महाविकास आघाडीच्या नेत्यांकडूनही बविआच्या आमदारांशी मतदाना संदर्भात यापूर्वी चर्चा झाली आहे.

परंतु, आपण कोणाला मतदार करणार आहोत, हे सांगायचं नसतं.त्यामुळे आम्हा एकत्र बसून आणि निर्णय घेवू आणि मतदान करु. मत देताना वसई-विरारच्या विकासाचा विचार करणार आहोत, अशी प्रतिक्रिया हिंतेंद्र ठाकूर यांनी दिली आहे. त्यामुळे बविआची मतदानाची भूमिका अद्यापही गुलदस्त्यातच आहे.

Edited By - Naresh Shende

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Assembly Election: एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंमध्ये संघर्ष; शिंदेविरुद्ध दोन ठाकरे

Maharashtra Election: महायुतीनं केलंय काम भारी! लाडक्या बहिणींना मिळणार २१०० रुपये, कोल्हापुरात महायुतीची १० वचनं

Maharashtra News Live Updates: भाजपचा मनसेचे उमेदवार बाळा नांदगावकर यांना पाठिंबा

Uddhav Thackeray: पीएम मोदींच्या अशुभ हातांनी बांधलेला पुतळा पडला'; उद्धव ठाकरेंची टीका

Bullet Train Bridge Collapsed: बुलेट ट्रेन प्रकल्पाचा निर्माणाधीन पूल कोसळला; अनेक कामगार मलब्याखाली दबले

SCROLL FOR NEXT