Pravin Darekar Saam TV
महाराष्ट्र

संभाजीराजे छत्रपती यांंचा गेम महाविकास आघाडीने केला - प्रविण दरेकर

संभाजी राजे छत्रपतींना सुरुवातीला पाठबळ दिलं आणि नंतर शरद पवार यांनी भूमिका बदलली - प्रविण दरेकर

डॉ. माधव सावरगावे

मुंबई : राज्यसभा निवडणूक लढणार नसल्याचं जाहीर केल्यानंतर संभाजीराजे छत्रपतींनी (Sambhajiraje Chhatrapati) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर नाराजी व्यक्त केली होती. शिवसेना पुरस्कृत अपक्ष उमेदवारी देण्याबाबतचा शब्द उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पाळला नाही, असं विधान संभाजीराजे यांनी माध्यमांशी बोलताना केलं होतं. त्यानंतर राजकीय वर्तुळातून विविध चर्चांना उधाण आलं होतं. याच पार्श्वभूमीवर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. छत्रपती संभाजी राजेंचा गेम महाविकास आघाडीने केला आहे. राजेंची कोंडी करत त्यांचा राजकीय गेम महाविकास आघाडीने केला. राजेंना शिवबंधन बांधण्याची अट घालने योग्य नव्हतं. राजेंना सुरुवातीला पाठबळ दिलं आणि नंतर शरद पवार (Sharad Pawar) यांनी भूमिका बदलली, असा आरोप दरेकर यांनी महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांवर केला आहे.

दरम्याम, दरेकर माध्यमांशी बोलताना पुढे म्हणाले, राजेंना सहा वर्ष भाजपने संधी दिली होती, मात्र त्यानंतर त्यांना महाविकास आघाडी समर्थन करेल, असे वाटत होते. त्यांनी भाजपला पक्षाची उमेदवारी मागितली असती, तर चित्र वेगळं असतं. त्यानंतरही फडणवीस म्हणाले की, सगळे समर्थन अपक्ष म्हणून देत असेल तर आम्हीही देऊ. भाजपकडे थेट मागितले असते, तर किमान प्रक्रिया सुरू झाली असती. त्यांनी आमच्याकडे मागण्यापेक्षा इतर लोकांकडे गेले, यावर आम्ही काय बोलायचं ? ते महाविकास आघाडीकडे फिरत होते आमच्याकडे फिरकले नाहीत. महाविकास आघडीनं राजेंचा अपमान ठरवून केलाय, असं म्हणत दरेकरांनी महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला आहे.

शाहू महाराज छत्रपती म्हणाले...

संभाजीराजे (Sambhaji Raje Chhatrapati) यांना उमेदवारी नाकारली याच्याशी घराण्याचा संबंध आला नाही. त्यांना व्यक्तिगत उमेदवारी नाकारली आहे. संभाजीराजे यांच्या राज्यसभेवर जाण्याच्या हालचाली जानेवारी महिन्यापासून सुरू होत्या. त्याचवेळी त्यांना आपली भूमिका स्पष्ट करायला अवधी होता. शेवटच्या टप्प्यात त्यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांना कदाचित तुम्ही अपक्ष म्हणून उभारा आम्ही तुम्हाला पाठिंबा देतो आणि महाविकास आघाडीचाही पाठिंबा घ्या, असा सल्ला मिळाला असेल. पण त्यात कितपत तथ्य आहे हे मला माहिती नाही. फडणवीस यांच्यासोबत महाविकास आघाडीच्या नेत्यांचीही त्यांनी भेट घेणे अपेक्षित होतं. पण त्यांनी तसे केले नाही, असंही शाहू महाराज छत्रपती म्हणाले.

Edited By - Naresh Shende

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : बाळासाहेब आणि उद्धव ठाकरेंशी गद्दारी म्हणजे आपल्या आईच्या दुधाशी बेईमानी : आमदार नितीन देशमुख

Maharashtra Politics: एकनाथ शिंदेंनी लातूरमध्ये टाकला मोठा डाव, 17 अपक्ष उमेदवारांचा शिवसेनेत प्रवेश

चालत्या फिरत्या माणसाला हृदयविकाराचा झटका; अवघ्या काही सेकंदात जीव गेला

Uddhav Thackeray: भाजप हा दलालांचा उपटसुंभांचा पक्ष ; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

America Target Iran: व्हेनेझुएलानंतर अमेरिकेच्या निशाण्यावर इराण; इराणमध्ये सत्तांतर होणार ?

SCROLL FOR NEXT