...तर हाच शनी भारी पडेल; उद्धव ठाकरेंवरील नवनीत राणांच्या टीकेनंतर दीपाली सय्यद कडाडल्या

खासदार नवनीत राणा यांनी हनुमान चालीसा पठण केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली होती.

Dipali Sayyed Vs Navneet Rana
Dipali Sayyed Vs Navneet Rana Saam Tv

मुंबई : खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी अमरावतीच्या रामनगर येथील मंदिरात हनुमान चालीसा पठण केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर टीका केली होती. 'उद्धव ठाकरे राज्यात शनी म्हणून बसले आहेत, या शनीची पीडा दूर व्हावी म्हणून आम्ही हनुमान चालीसा पठण करत आहोत.', असं वक्तव्य राणा यांनी केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यामुळं राजकीय वातावरण तापलं असून शिवसेना नेत्या दिपाली सय्यद (Deepali Sayed) यांनीही नवनीत राणांवर तोफ डागली आहे. राणाबाई शनी मागे लागल्यावर मानसिक स्थिती ढासळते, तुम्हाला तपासणीची गरज आहे. जरा अमरावतीकरांकडे लक्ष द्या, नाहीतर निवडणुकीत हा शनी तुमच्यावर भारी पडेल. सर्कशीतील माकडांना सुद्धा लाजवाल असा कारभार चाललाय तुमचा, असं ट्विट करत दिपाली सय्यद यांनी राणा यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.

अमरावतीचे खासदार नवनीत राणा (Navneet Rana)आणि पती रवी राणा दिल्लीवारी करुन आज नागपूरमध्ये पोहोचले. त्यानंतर राण दाम्पत्याने रामनगर येथील मंदिरात हनुमान चालीसा आणि आरतीचे पठण केले. यावेळी माध्यमांशी बोलताना नवनीत राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली होती. दरम्यान, राणा दाम्पत्याने नागपूर येथील रामनगर येथील मंदिरात हनुमान चालीसा आणि आरतीचे पठण केले. आजच राष्ट्रवादी काँग्रेसनेही (NCP)त्याच ठिकाणी हनुमान चालीसाचे पठण केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे महागाई विरोधात आज आंदोलन होते. दोन्ही चालीसा पठणाला आज पोलिसांनी परवानगी दिली होती. (Navneet Rana Latest News)


Dipali Sayyed Vs Navneet Rana
देशात, राज्यात कुठेही हनुमान चालीसा म्हणण्यावर बंदी नाही: देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यात शनी म्हणून बसले आहेत, या शनीची पीडा दूर व्हावी म्हणून आम्ही हनुमान चालीसा पठण करत आहे. मुख्यमंत्र्यांनी राज्यातील आणि विदर्भातील समस्यांशी काही घेणेदेणे नाही. राज्यातील असंख्य समस्या दूर व्हाव्यात म्हणून आम्ही हनुमान चालीसा पठण करत आहे. या सरकारला हनुमान चालीसा पठणाची इतकी ऍलर्जी का हा प्रश्न आहे, असंही राणा म्हणाल्या.

Edited By - Naresh Shende

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com