Pankaja Munde Latest Speech  Saam TV
महाराष्ट्र

Pankaja Munde News: माझ्या खांद्यावर बंदूक ठेवू नका; पंकजा मुंडे यांचा रोख कुणाकडे? अमित शाहांची भेट घेणार

Pankaja Munde Latest News: काही जण माझ्या खांद्यावर बंदूक ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. माझ्या खांद्याची तेवढी रुंदी आहे. परंतू त्यावर कोणालाही विसावू देणार नाही, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

साम टिव्ही ब्युरो

Pankaja Munde Latest News: काही जण माझ्या खांद्यावर बंदूक ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. माझ्या खांद्याची तेवढी रुंदी आहे. परंतू त्यावर कोणालाही विसावू देणार नाही, मी राजकारणात जी भूमिका घेईल ती छातीठोकपणेच घेईल, लवकरच मी अमित शहा यांची भेट घेणार असून त्यांच्यासोबत चर्चा करणार असल्याचं पंकजा मुंडे यांनी सांगितलं. त्या गोपीनाथ गडावरून बोलत होत्या. (Latest Marathi News)

बीडच्या परळी तालुक्यातील गोपीनाथ गडावर दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या नवव्या स्मृतिदिनानिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले. यावेळी पंकजा मुंडे जोरदार भाषण करत आपल्या मनातील खदखद बोलून दाखवली. दरम्यान, गोपीनाथ मुंडे यांना अभिवादनासाठी राज्यभरातील समर्थकांनी गर्दी केली होती.राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे, माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी समाधी स्थळाचे दर्शन घेत अभिवादन केले.(Maharashtra Political News)

काय म्हणाल्या पंकजा मुंडे?

"मी कोणाच्या खांद्यावर नव्हे तर काही जण माझ्या खांद्यावर बंदूक ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. माझ्या खांद्याची तेवढी रुंदी आहे. परंतु, त्यावर कोणालाही विसावू देणार नाही. राजकारणात जी भूमिका घेईल ती छातीठोकपणेच घेईल", असं पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी म्हटलं आहे.

लवकरच मी माझे नेते अमित शहा (Amit Shah) यांची भेट घेणार असून त्यांच्यासोबत मुक्तपणे चर्चा करणार असल्याचं पंकजा मुंडे यांनी सांगितलं. माझ्या भूमिका स्पष्ट असतात, मी त्या छातीठोकपणे घेते. मी माझ्या नेत्यांना भेटणार असून, त्यांच्याशी मुक्त चर्चा करणार आहे. माझ्यासाठी तुमच्या मनात काय आहे, हे विचारणार आहे. स्पष्टता आल्याशिवाय पुढे चालता येणार नाही, असंही त्या म्हणाल्या.

अमित शहा हे माझे नेते असून मी त्यांना भेटीसाठी वेळ मागितला आहे. त्यांना मी विचारणार आता माझा पिता जिवंत नाही. माझं नेतृत्व करावं असा व्यक्ती सापडला, त्याच्याशी मी बोलणार आहे... हित चिंतक खूप आहेत.. सगळेच आहेत, पक्षात आणि दुसऱ्याही पक्षात आहेत. मी दररोज रडगाण गाणारी नाही असंही पंकजा मुंडे म्हणाल्या.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Railway Recruitment: खुशखबर! कोणत्याही परीक्षेशिवाय मिळणार रेल्वेत नोकरी; ४११६ पदांसाठी भरती; अर्ज कसा करावा?

Local Body Election : काँग्रेस जिल्हाअध्यक्षाचे अपहरण अन् मारहाण, VIDEO ने महाराष्ट्रात खळबळ, हिंदुत्ववादी संघटनेवर आरोप

WTC Points Table: गुवाहाटी टेस्टमधील पराभव टीम इंडियाला पडणार महागात, WTC पॉईंट्स टेबलमध्ये होणार घसरण, पाहा समीकरण

Mahayuti: अजित पवारांच्या आमदाराकडून काँग्रेसचा प्रचार, महायुतीतील संघर्ष टोकाला

Chanakya niti: दुपारच्या वेळेस का झोपू नये? चाणक्यांनी सांगितलं महत्त्वाचं कारण

SCROLL FOR NEXT