Narayan Rane vs Ramdas kadam Saam Tv
महाराष्ट्र

Rane vs kadam: ...तर राम राम म्‍हणण्‍याची वेळ येईल; नारायण राणे यांचं रामदास कदम यांना प्रत्युत्तर

Narayan Rane : सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट लिहित नारायण राणे यांनी शिवसेना नेते रामदास कदम यांना प्रत्युत्तर दिलं. या दोघांमधील आरोप-प्रत्यारोपामुळे महायुतीत फूट पडण्याची शक्यता आहे. काय आहे दोन्ही नेत्यांमधील वाद?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

(आवेश तांदळे, मुंबई)

Narayan Rane Replied To Ramdas Kadam :

राज्यातील भाजप केसाने गळा कापत असल्याचा आरोप शिवसेना नेते रामदास कदम यांनी केला होता. कदम यांच्या आरोपाला भाजप नेते नारायण राणे यांनी रामदास कदम यांना प्रत्युत्तर दिलंय. एक्स अकाउंटवर ट्विट करत रामदास कदम यांच्यावर राम-राम करण्याची वेळ येईल, असं नारायण राणे म्हणालेत. (Latest News)

एक्स अकाउंटवर ट्विट करत नारायण राणेंनी रामदास कदम यांना प्रत्युत्तर दिलंय. राणे यांच्या प्रत्युत्तरामुळे भाजप आणि शिवसेना शिंदे गटात वाद जुपण्याची शक्यता आहे. आमचे मित्रपक्ष आणि सहकारी यांच्या गळ्यात हार पडावे, त्यांचा सन्मान व्हावा, यासाठी भारतीय जनता पक्ष नेहमी कार्यरत असतो.आम्ही केसाने गळा कापत नाही. केसाने गळा कापणारे आता रानोमाळ फिरत आहेत. आपणच आपले नाव घेऊन काय उपयोग? जनमानसात आपले नाव असले पाहिजे. फांदीवर बसलेल्‍यांनी आव्‍हानाची भाषा करू नये, नाही तर आपल्‍याच फडफडीने फांदी तुटून राम राम म्‍हणण्‍याची वेळ येईल, अशी नारायण राणे यांनी पोस्ट केलीय.

लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) उमेदवारीवरून महायुतीमध्ये वाद उद्भवू लागले आहेत. रामदास कदम यांनी महाराष्ट्रात शिवसेना (Shiv Sena) आणि राष्ट्रवादी मोदी आणि शाह यांच्या कामावर विश्वास ठेवून आम्ही आलो. आमचा विश्वासघात होणार नाही, याची त्यांनी दक्षता घेणं आवश्यक आहे. सीटींग जागांवरही भाजपची काही मंडळी प्रयत्न करत आहेत. उमेदवारीसाठी तालुक्यात, मतदारसंघात जात आहेत, शिवसेना-राष्ट्रवादीच्या सींटिंग जागांवर जबरदस्तीचा प्रयत्न सुरू असल्याची टीका रामदास कदम यांनी केली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : दादरमध्ये उद्धव ठाकरेंचा झेंडा फडकणार, युवा सेनेचा विश्वास

आज लागणार महानिकाल! कसं आहे मतमोजणीचे वेळापत्रक, पाहूया

Bachchu Kadu : विधानसभा निकालाआधी बच्चू कडूंना मोठा दिलासा, कोर्टाकडून निर्दोष सुटका, नेमकं प्रकरण काय?

Shukra Shani Yuti: पुढच्या महिन्यात होणार शुक्र-शनीची युती; 'या' राशींच्या तिजोरीत येणार पैसा

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT