Narayan Rane, Ajit Pawar saam tv
महाराष्ट्र

Narayan Rane: 'नादी लागू नका, नाहीतर पुण्यात येऊन…' नारायण राणेंचा अजित पवारांना इशारा; 'त्या' वक्तव्यावरुन केला हल्लाबोल

एका बाईने नारायण राणेंना हरवलं," अशी टीका अजित पवार यांनी केली होती.

Gangappa Pujari

Chinchwad By Election: कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीची रणधुमाळी सध्या सुरू आहे. कालच या निवडणूकीतील प्रचाराच्या तोफा थंडावल्या. या प्रचारसभेत विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी सक्रिय सहभाग घेतला होता. चिंचवडमधील राष्ट्रवादीचे उमेदवार नाना काटे यांच्या प्रचारसभेत त्यांनी नारायण राणेंवर जोरदार हल्लाबोल केला होता.

शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर नारायण राणेंचा (Narayan Rane) वांद्रे येथे एका बाईने पराभव केला होता, असे अजित पवार म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर नारायण राणेंनी अजित पवारांवर निशाणा साधला आहे.

काय म्हणाले नारायण राणे...

अजित पवारांच्या (Ajit Pawar) या टोलेबाजीला नारायण राणे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. "अजित पवारांना बारामतीच्या बाहेर कितपत राजकारण कळतं, हे मला माहीत नाही. त्यांनी माझ्या नादी लागू नये," नाहीतर मी पुण्यात येऊन त्यांचे बारा वाजवेन, असा थेट इशारा नारायण राणे यांनी दिला आहे.

त्याचबरोबर पुढे बोलताना त्यांनी "खरं म्हणजे मला त्याच्याबद्दल बोलायचेच नाही. तो ज्याप्रकारचा राजकारणी आहे, त्याबद्दल बोलूच नये. बारामतीच्या बाहेर त्याने दुसऱ्यांचे बारसे घालायला जाऊ नये. दुसऱ्यांना नावं ठेवू नये," अशा शब्दात अजित पवारांवर हल्लाबोल केला आहे.

काय म्हणाले होते अजित पवार..

नाना काटे यांच्या प्रचारसभेत बोलताना अजित पवार यांनी "ज्या ज्या नेत्यांनी शिवसेना सोडली, ते सर्व नेते निवडणुकीत हरले आहेत. नारायण राणे हे जेव्हा शिवसेनेतून बाहेर पडले होते, ते तर दोनवेळा निवडणुकीत हरले. वांद्रे येथे तर एका बाईने नारायण राणेंना हरवलं," अशी टीका केली होती.

दरम्यान, कसबा आणि चिंचवड पोटनिवडणूकीसाठी उद्या मतदान होणार असून, २ मार्चला मतमोजणी होवून निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे गुलाल कोण उधळणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. (Maharashtra Politics)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अंबरनाथमध्ये शिवसेनेतर्फे अवघ्या १० रुपयांत दिवाळी फराळ साहित्य वाटप

Moong vs Chana Sprouts: मूग की चणा स्प्राउट्स, वजन कमी करण्यासाठी सकाळी नाश्त्याला काय खावे?

Pune Fort : मराठा साम्राज्याचा शेवटचा किल्ला कोणता? पुण्याजवळ लपलाय 'हा' ऐतिहासिक खजिना, दिवाळीच्या सुट्टीत नक्की फिरा

Farmers Protest: शेतकरी आंदोलनाचा तिसरा दिवस, पुणे-बंगळुरू महामार्ग ठप्पच; परिवहन विभाग अन् गोकुळच्या दूध विक्रीला फटका

Sukanya Samriddhi Yojana: सुकन्या समृद्धी योजनेत दरमहा ₹२,००० भरल्यास मुलगी होणार लखपती! मॅच्युरिटीला मिळणाऱ्या पैशांवर टॅक्स लागतो का?

SCROLL FOR NEXT