mohit kamboj  Saam Tv
महाराष्ट्र

Mohit Kambhoj: 'पाळलेलं कोण आहे हे जनता दाखवेल...' मोहित कंबोज यांचा भास्कर जाधवांवर हल्लाबोल, व्हिडिओ शेअर करत दिले आव्हान

तुमच्या सारखे पक्ष बदलणारे रस्त्यावर विकले जातात," अशी टीका मोहित कंबोज यांनी केली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Mohit Kamboj Tweet: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आरोप करणाऱ्या भास्कर जाधवांनी गुवाहाटीचं तिकिट बुक केलं होतं, त्यांनी एकनाथ शिंदे यांना 100 वेळा फोन केला होता असा गौप्यस्फोट भाजप नेते मोहित कंबोज यांनी केला होता. या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या होत्या. मोहित कंबोज यांच्या वक्तव्यानंतर १०० बापांची पैदास असेल तर आरोप सिद्ध करा अशी टीका भास्कर जाधव यांनी केली.

यावर मोहित कंबोज यांनी आणखी एक ट्विट करत भास्कर जाधव यांच्यावर टीका केली आहे, ज्यामुळे भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) आणि मोहित कंबोज (Mo यांच्यामधील वाद चांगलाच पेटण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत..

काय आहे मोहित कंबोज यांचे ट्विट..

भास्कर जाधव यांच्या आव्हानानंतर मोहित कंबोज यांनी आणखी एक नवे ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये मोहित कंबोज यांनी "भास्कर जाधव सत्यापासून दूर पळू शकत नाही, आईचे दूध प्यायले असेल तर मी सांगितलेल खोट आहे हे सिद्ध करा, असे म्हणत जो आयुष्यात एका पक्षाचा नव्हता, तो कोणाचा असेल का, तुमच्या सारखे पक्ष बदलणारे रस्त्यावर विकले जातात," अशी टीका केली आहे.

व्हिडिओही केला ट्विट....

या ट्विटसोबत मोहित कंबोज यांनी एक व्हिडिओही ट्विट केला आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी "गुवाहाटीला जाताना किती वेळा फोन केला, उद्धव ठाकरे यांना काय काय बोलला, याचे सत्य बाहेर आल्यामुळे तुम्ही चिडला आहात, हा व्हिडिओ सेव्ह करुन ठेवा, तुम्ही २०२४ मध्ये उद्धव ठाकरेंसोबत राहता का हे महाराष्ट्र पाहणार आहे," अशा शब्दात टीका केली आहे. तसेच या व्हिडिओमध्ये भास्कर जाधव यांनी जिभेला आवर घालण्याचाही इशारा मोहित कंबोज यांनी दिला आहे..

तत्पुर्वी मोहित कंभोज यांच्या कालच्या खुलाश्यानंतर भास्कर जाधव यांनी जर शंभर बापांची पैदास असेल, तर हा आरोप सिद्ध करणार नाही आणि तो जर शंभर बापाची पैदास नसेल, तर त्याने यातील एकतरी आरोप सिद्ध करून दाखवावा", असं आव्हान त्यांनी कंबोज यांना दिले होते. या ट्विटनंतर आता भास्कर जाधव आणि मोहित कंबोज यांच्यामधील वाद चांगलाच वाढणार असल्याचे दिसत आहे.(Latest Marathi Update)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

New Pune Bengaluru Highway : पुण्यातून सहा पदरी राष्ट्रीय महामार्ग जाणार, २०६ किमी लांब, ४२ हजार कोटींचा खर्च, वाचा नेमका मास्टरप्लान

Wedding Look: या लग्नसराईसाठी जान्हवीचे 'हे' देसी लूक ट्राय करा, तुम्हीही दिसाल ग्लॅमरस आणि अट्रॅक्टिव्ह

Liver Cancer Risk: कंबरदुखी वाढत चाललीये? लिव्हर कॅन्सरचा धोका नाही ना? वाचा लक्षणे

Maharashtra Live News Update : मावळात राष्ट्रवादी काँग्रेसकडून जिल्हा परिषदेसाठी पहिली उमेदवारी जाहीर

Pune : पुण्यात भयंकर हत्याकांड, बिझनेसमनने बायकोचा गळा दाबला, भट्टीमध्ये बॉडी जाळली, अन् राख....

SCROLL FOR NEXT