bjp, dharashiv, police, mseb saam tv
महाराष्ट्र

MSEB News : अतिरिक्त कार्यकारी अभियंत्यास मारहाण; भाजप नेता, मुलासह अडचणीत, दहा जणांवर गुन्हा दाखल

या घटनेतील संशयितांना तातडीने अटक करा अशी मागणी एमएसबीच्या कर्मचा-यांनी केली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

- कैलास चाैधरी

Dharashiv : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या (maharashtra rajya vidyut vitaran company) अधिकाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी धाराशिव शहर पोलिस ठाण्यात (dharashiv city police station) भाजप नेता, त्याच्या मुलासह अन्य दहा जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान या मारहाणीचा महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या कर्मचा-यांनी निषेध नाेंदविला आहे. (Maharashtra News)

अतिरिक्त कार्यकारी अभियंता रविंद्र पवार (वय ५२) यांनी दिलेल्या तक्रारीनूसार पाेलिसांनी सुधीर पाटील (bjp leader sudhir patil), अभिराम सुधीर पाटील यांच्या अन्य दहा जणांवर शासकीय कामात अडथळा निर्माण केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे (mseb) अतिरिक्त कार्यकारी अभियंता रवींद्र पवार हे त्यांचे कार्यालयीन कामकाज करत असताना सुधीर पाटील आणि त्यांचा मुलगा अभिराम यांनी पवार यांना बेदम मारहाण केल्याचे तक्रारीत म्हटलं आहे. तसेच पवार यांना जिवे मारण्याची धमकी दिल्याचे ही त्यांनी नमूद केले आहे. त्यानूसार पाटील यांच्यासह दहा जणांवर (कलम 353, 332,504,506, 143,147,149) गुन्हा नोंदविण्यात आला असल्याची माहिती पाेलिसांनी दिली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सातपुड्यातील सर्वात उंच शिखरावर होणाऱ्या अस्तंबा यात्रेसाठी प्रशासन सज्ज

Rahul Gandhi : निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत इंडिया आघाडीचा 'महामोर्चा', नजर फिरेल तिथपर्यंत आंदोलक, पाहा व्हिडीओ

Meditation Tips: मेडिटेशन करायचंय, पण सुरुवात कशी करणार? जाणून घ्या स्टेप बाय स्टेप सोप्या टिप्स

Fact Check : महाराष्ट्रातील रेशन कार्डधारकांना ९००० रुपये मिळणार, सुनेत्रा पवारांच्या नावाने मेसेज व्हायरल, सत्य आलं समोर

Bank Fraud : बँक खात्यातून अचानक पैसे गायब झाले? घाबरू नका! RBI च्या नियमांनुसार मिळू शकतो पूर्ण रिफंड

SCROLL FOR NEXT