Ujjwal Nikam Will Become Union Minister Saamtv
महाराष्ट्र

Ujjwal Nikam: उज्ज्वल निकम यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Ujjwal Nikam Will Become Union Minister : उज्ज्वल निकम फक्त खासदारकीसाठी राज्यसभेवर घेतले नाहीये तर त्यांना मोदी सरकारमध्ये मंत्रीपद मिळू शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

Bharat Jadhav

ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागू शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. याबाबत भाजपा नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी सूचक शब्दांत प्रतिक्रिया दिलीय. दरम्यान उज्ज्वल निकम, माजी परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रुंगला, केरळ भाजपचे नेते सी. सदानंदन मास्टर आणि इतिहासाच्या अभ्यासक डॉ. मीनाक्षी जैन यांची नुकतीच राज्यसभेवर नामनिर्देशित सदस्य म्हणून नियुक्ती झालीय.

भाजप नेते गिरीश महाजन प्रसारमाध्यम प्रतिनिधींशी बोलत होते, यावेळी त्यांना उज्ज्वल निकम यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार, असा प्रश्न विचारण्यात आला. काहीही अशक्य नाहीये असे म्हणत महाजन यांनी सुचक संकेत दिलेत. उज्ज्वल निकम यांची राज्यसभेवर नियुक्ती झाल्याबाबत त्यांचे अभिनंदन. त्यांचे अभिनंदन करण्यासाठी त्यांना लगेच फोनही केला होता.

लोकसभेला थोड्या मतांनी त्यांचा पराभव झाला, याचं दुःख आम्हा सर्वांना होते. उज्ज्वल निकम माझे चांगले मित्र आहेत. ते राज्यसभेवर गेले आहेत. निकम यांची राज्यसभेवरील नियुक्ती केवळ खासदारकीसाठी नसेल, ते मोठे वकील आहेत, त्यांनी खूप चांगले काम राज्यात आणि देशात केलंय. दहशतवादासंदर्भातील केसेस, देशद्रोह्यांबाबतच्या केसेस ते लढलेत. त्यामुळे होऊ शकते, काही अशक्य नाही.

पण जर उज्ज्वल निकम यांना केंद्रीय मंत्रिमंडळात घेतले, तर रक्षा खडसे यांच्या मंत्रि‍पदाला काही धोका निर्माण होणार का? असा सवाल गिरीश महाजन यांना करण्यात आला. त्यावर बोलताना महाजन म्हणाले,असं काही होईल असं वाटत नाही. आम्ही पण भाजपचे दोन लोक येथे आहोत. राज्याचे तीन-चार मंत्री आहेत. त्यामुळे कोणता धोका असेल असं वाटत नाही. पण शेवटी पक्षश्रेष्ठी आहेत, कुणाला मंत्री करायचे, कुणाला करायचे नाही. कुणाला काढायचे, कुणाला ठेवायचे, ते ठरवतील, असं महाजन म्हणालेत.

राज्यसभेवर नियुक्त झालेल्या चारही सदस्यांचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी अभिनंदन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या सर्व सदस्यांचा व त्यांच्या योगदानाचा गौरव केला. नामांकित वकील अशी ओळख असलेले ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांनी अनेक महत्त्वाच्या खटल्यांत सरकारची बाजू मांडून आरोपींना शिक्षा दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live Update: वाशिमच्या रिसोड तालुक्यात दोन तास मुसळधार पाऊस

Hair Spa: हेअर स्पा करताय? तर थांबा, आधी 'हे' होणारे गंभीर परिणाम वाचाच

Cricketer Death : प्रसिद्ध भारतीय क्रिकेटपटूचे निधन, पुण्यात घेतला शेवटचा श्वास; क्रिकेटजगतात हळहळ

Pune Accident : पुण्यात पुन्हा एकदा भीषण अपघात; प्रवाशांनी भरलेली कार दरीत कोसळली

Janmashtami Baby Photos: मोरपिस व बासरीसह मुलांना द्या गोंडस कृष्ण रूप

SCROLL FOR NEXT