Devendra Fadnavis And Raj Thackeray
Devendra Fadnavis And Raj Thackeray  Saam tv
महाराष्ट्र

राज्य सरकार विरोधात आम्ही लढतोय, राज ठाकरेंनी पण लढावं - देवेंद्र फडणवीस

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : महाविकास आघाडी सरकार (MVA Government) स्थापन झाल्यापासून विरोधी पक्ष भाजपनं नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांवरुन राज्य सरकारची कोंडी केली आहे. आगामी होणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने पोलखोल सभा घेत राज्य सरकारच्या कारभारावर टीकास्त्र सोडलं. त्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी घेतलेला हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुनही राजकीय वातावरण तापलं. मशिंदीवरील भोंगे उतरवण्याच्या इशारा राज यांनी ठाकरे सरकारला दिला होता. मात्र, राज्य सरकारने सकारात्मक प्रतिसाद न दिल्याने पुन्हा एकदा राजकीय वातावरण ढवळून निघालं.या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे. राज ठाकरेंनी राज्य सरकारकडून अपेक्षाच ठेवू नये. जे सरकार लांगूलचालन करतंय,ज्या सरकारने इतक्या मर्यादा सोडल्यात अशा सरकार विरोधात आम्ही लढतोय. राज ठाकरेंनी पण राज्य सरकार विरोधात लढावं, असं आवाहन फडणवीस यांनी राज ठाकरेंना केलं आहे.

फडणवीसांनी माध्यमांशी बोलताना शरद पवारांवरही टीका केली आहे. शरद पवारांनी महाराष्ट्रातल्या प्रश्नांकडे लक्ष दिलं तर अधिक चांगलं होईल. पवारांच्या बहुमूल्य सल्ल्याची आवश्यकता श्रीमान उद्धव ठाकरेंना आहे, त्यांना तो द्यावा असे फडणवीस म्हणाले आहेत. राज ठाकरे यांना उत्तर प्रदेशमधिल अयोध्येचे खासदार ब्रीज भूषण यांनी विरोध केला आहे. त्यावर फडणवीस म्हणाले त्यांच्या विरोधाचं कारण मला माहित नाही. रामाच्या शरणात जो जात असेल त्याला जाऊ दिलं पाहिजे, रामाच्या शरणात जाण्यापासून कुणाला रोखण्याचे काही कारण नाही, अस माझं मत आहे असेही फडणवीस म्हणाले आहेत.

मुंबईत उत्तर प्रदेश सरकारचे कार्यालय स्थापन करण्यात आले आहे. त्यावर बोलताना फडणवीस म्हणाले की मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे. उत्तर प्रदेश सरकारने मुंबईत ऑफिस सुरू केलं तर लगेच घाबरून जाण्याची गरज नाही. मुंबई आणि महाराष्ट्र पावरफुल्ल आहे. उत्तर प्रदेश सरकारच्या कार्यालयाचा काहीही परिणाम महाराष्ट्रावर होणार नाही.

Edited By - Naresh Shende

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tuljabhavani Mandir : तुळजाभवानी मंदिरात सुरक्षा रक्षकाकडून महिला भाविकास धक्काबुक्की

Mumbai Indians Playing XI: हैदराबादविरुद्ध अर्जुन तेंडुलकरला संधी मिळणार? पाहा कशी असेल मुंबईची प्लेइंग ११

Solo Travel Tips: एकट्याने फिरायला जाण्याची आवड आहे;मग 'या' गोष्टी ठेवा लक्षात

Baramati Constituency: हे चार विधानसभा मतदारसंघ संवेदनशील जाहीर करा; राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाची मागणी

Nashik Loksabha: मनधरणी निष्फळ! शांतीगिरी महाराज अपक्ष लढण्यावर ठाम; नाशिकमध्ये महायुतीची वाट बिकट?

SCROLL FOR NEXT