Devendra Fadnavis news  saam tv
महाराष्ट्र

Devendra Fadnavis: 'माझी सुपारी दिली...' संजय राऊतांच्या आरोपावर फडणवीसांची टीका, म्हणाले; 'त्यांना प्रसिद्धीची..

संजय राऊत यांना सध्या प्रसिद्धीची सवय लागली आहे. त्यामुळे रोज नवीन आरोप करतात, असा हल्लाबोल त्यांनी केला आहे.

Gangappa Pujari

सचिन जाधव..

Pune: आपल्याला जीवे मारण्याची सुपारी दिल्याचा आरोप ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केला होता. खासदार श्रिकांत शिंदे यांचे थेट नाव घेत राऊतांनी हा मोठा गौप्यस्फोट केला होता, ज्यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ माजली आहे.

याबद्दलचे पत्रही त्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवले असून यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे. (Devendra Fadnavis)

याबाबत अधिक माहिती अशी की, कॉंग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्यानंतर संजय राऊत यांनीही जीवे मारण्याचा डाव असल्याचा आरोप केला आहे. यावर बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी "संजय राऊत यांनी जी तक्रार दिली आहे ती तक्रार सुरक्षेसाठी दिले आहे की, सनसनाटी निर्माण करण्यासाठी आहे त्याची चौकशी केली जाणार," असल्याचे सांगितले आहे.

याबद्दल पुढे बोलताना त्यांनी "सुरक्षा व्यवस्थेचा विषय घेऊन तो राजकारणाशी जोडणं चुकीचे आहे. मात्र संजय राऊत (Sanjay Raut) गेल्या काही दिवसांपासून त्यांना प्रसिद्धीची सवय लागली आहे. त्यामुळे त्यांच्याकडून बिनडोकपणाचे आरोप केले जात आहेत," असा हल्लाबोलही त्यांनी यावेळी केला..

चिंचवडची जागा आम्हीच जिंकू...

राज्यात सध्या चिंचवड आणि कसबा पोट निवडणूकीची रणधुमाळी सुरू आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह अनेक भाजपा नेते सध्या पुण्यात तळ ठोकून आहेत. या निवडणूकीबद्दल बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी "चिंचवड पोट निवडणूकीची जागा आम्ही जिंकू," असा विश्वास व्यक्त केला आहे.

दरम्यान, भाजपाकडून चिंचवडमध्ये दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना उमेदवारी देण्यात आली असून त्यांच्यासमोर महाविकास आघाडी पुरस्कृत राष्ट्रवादीचे नाना काटे यांचे तगडे आव्हान आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Accident: पुण्यात अपघाताचा थरार! नवले पुलाजवळ भरधाव कंटेनरने अनेक वाहनांना उडवलं, ४ जणांचा मृत्यू

Black Dark Lips: ओठांवरचा काळपटपणा कसा दूर कराल? या जादुई टिप्स वाचा

काँग्रेस उमेदवाराची कमाल, डिपॉझिट म्हणून चिल्लर भरली; निवडणूक अधिकारीही चक्रावले|VIDEO

Maharashtra Live News Update: पुणे -बंगळुरू महामार्गावर भयंकर अपघात, कंटेनरची एकमेकांना धडक

Yami Gautam: कॉन्ट्रास्ट फॅशनचा नवा ट्रेंड, कश्मिरी ब्यूटी यामी गौतमचा पिंक ड्रेस लूक व्हायरल, पाहा PHOTO

SCROLL FOR NEXT