नागपूर : आदित्य ठाकरे हे उत्तर देण्याच्या लायक नाहीत अशी बोचरी टीका राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केली आहे. ते नागपूर (Nagpur) विमाताळवर माध्यमांशी बोलत होते. 'प्रत्येक महामंडळाच्या बस स्थानकावर शिंदे सरकारचे होर्डिंग्स लागले आहेत. या होर्डिंगसाठी पैसे दिले आहेत की नाही? हे अजूनही माहीत नाही.
दिले असतील तर कुणी दिले? आणि दिले नसतील तर याची नुकसानभरपाई कोण करणार? एवढे सगळे राजकीय होर्डिंग्स बघून मला मळमळायला लागलं आहे. सणापासून राजकारण बाजुला ठेवलं पाहिजे. मात्र, सगळीकडे उधळपट्टी सुरू आहे.
पाहा व्हिडीओ -
सरकारने महागाई, शेतकऱ्यांच्या नुकसानीवर, बेरोजगारीवर बोलायला हवं. पण हे सरकारमध्ये केवळ उधळपट्टी सुरू आहे.' अशी टीका आदित्य ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर केली होती. त्यांच्या याच टीकेला उत्तर देताना आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) हे उत्तर देण्याच्या लायक नसल्याचं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.
तर यावेळी फडणवीस यांनी प्रतिज्ञापत्राच्या मुद्यावर देखील भाष्य केलं, पक्ष व चिन्हाबद्दलच्या वाद आयोगाकडे सुरु असतांना प्रतिज्ञापात्राची गरज नसते. त्यामुळे या संदर्भात कुठून बातम्या येतात हेच मला कळत नाही असं फडणवीस म्हणाले. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मी सोबत महाराष्ट्राचा दौरा करणार असून, काही ठिकाणी सोबत दौरा करू तर काही ठिकाणी स्वतंत्र दौरा करणार असल्याची माहीती देखील फडणवीसांनी यावेळी सांगितली.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.