Bacchu Kadu News
Bacchu Kadu News saam tv
महाराष्ट्र

बच्चू कडूंच्या अडचणी वाढणार; तलवारीने केक कापला, VIDEO व्हायरल

साम टिव्ही ब्युरो

अमर घटारे

Bacchu Kadu News : माजी मंत्री व आमदार बच्चू कडू यांनी सार्वजनिक ठिकाणी तलवारीने केक कापल्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे . बच्चू कडू यांनी वाढदिवसानिमित्त तलवारीने केक कापून वाढदिवस साजरा केला. बच्चू कडू यांचा हा केक कापतानाचा व्हिडिओ सोशल व्हायरल झाला आहे. बच्चू कडू यांनी सार्वजनिक ठिकाणी विनापरवाना धारधार शस्त्र वापरल्याचा आरोप भाजप नेत्याकडून करण्यात येत आहे. यामुळे बच्चू कडू यांच्यावर कारवाईची मागणी केली जात आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, माजी मंत्री , आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी सार्वजनिक ठिकाणी तलवारीने केक कापला आहे. केक कापतानाचा बच्चू कडू यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल व्हायरल झाला आहे. सार्वजनिक ठिकाणी विनापरवाना बच्चू कडू यांनी धारधार शस्त्र वापरल्याचा आरोप करण्यात येत आहे. यामुळे भाजप नेते माजी नगरसेवक गोपाल तिरमारे यांनी बच्चू कडू यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. माजी नगरसेवक गोपाल तिरमारे यांनी बच्चू कडू यांच्यावर थेट कारवाईची मागणी केली आहे.

बच्चू कडू यांच्यावर कायदेशीर कारवाईसाठी गोपाल तिरमारे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकाकडे तक्रार केली आहे. त्यामुळे अमरावती (Amravati) जिल्ह्यात बच्चू कडू यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. तिरमारे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकाकडे तक्रार केल्यानंतर पोलीस हे बच्चू कडू यांच्यावर कारवाई करणार का ? हे पाहावे लागणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Johnny Lever: कोण आहे आमिर खान? मुलाखतीदरम्यान जॉनी लीव्हर काय म्हणाला? VIDEO

KKR vs DC: इडन गार्डनवर दिल्लीचा दारूण पराभव; कोलकाताचा ६वा विजय

Maharashtra Election:'..त्यांचा सत्यानाश होणार'; अकलूजमधून फडणवीसांचा मोहिते-पाटलांना इशारा

3.99 लाख रुपये किंमत, 25km मायलेज; सीएनजी आणि इलेक्ट्रिकपेक्षा बहजत 'या' कारला आहे मागणी

Maharashtra Election: नाशकातून शिंदे गटाने तिकीट दिल्याचा दावा; कोण आहेत शांतीगिरी महाराज?

SCROLL FOR NEXT