Chitra Wagh Bjp संजय राऊत यांच्यावर कारवाईची चित्रा वाघ यांची मागणी Saam TV
महाराष्ट्र

Chitra Wagh BJP: " कानून सब के लिए एक है, तो शिक्षा भी सब के लिए एक होनी चाहिये" चित्रा वाघ

शिवसेना खासदार संजय राऊत आणि शिवसेना मंत्री गुलाबराव पाटलांवर महिलांची बदनामी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केली आहे.

विनोद जिरे

बीड : शिवसेना खासदार संजय राऊत आणि शिवसेना मंत्री गुलाबराव पाटलांवर महिलांची बदनामी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी भाजप नेत्या चित्रा वाघ (BJP Leader Chitra Wagh) यांनी केली आहे. (BJP Leader Chitra Wagh Demands action against Sanjay Raut)

बीडमध्ये पत्रकारांशी बोलताना त्या म्हणाल्या म्हणाल्या, "मूठभर महिलांची इज्जत ही इज्जत आणि बाकीच्या महिला कचरा हे महाराष्ट्रात (Maharashtra) चालणार नाही. राज्यातल्या प्रत्येक महिलेची डिग्निटी त्याठिकाणी जपली गेली पाहिजे. याच्यासाठी सरकारने कडक पावले उचलली पाहिजेत. आजच मी राज्याच्या सन्माननीय गृहमंत्र्यांना (Dilip Walse Patil) पत्र दिलं आहे. जर एका माणसाने एका महिलेची केलेली बदनामी ही बदनामी होत असेल, तर सत्ताधारी पक्षातील कोणी दुसऱ्या महिलांवर केलेली बदनामी, त्यांचा बोलनं हे आक्षेपहार्य आणि आपत्तीजनक कसं असू शकणार नाही?"

" कानून सब के लिए एक है, तो शिक्षा भी सब के लिए एक होनी चाहिये" म्हणूनच शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करावा. अशी मागणी केल्याचं चित्रा वाघ म्हणाल्या.

त्या पुढे म्हणाल्या, "आम्ही भाजपच्या लोकांचं समर्थन करत नाही, त्याच्यावर कारवाई केली ते योग्यच केली. मग गुलाबराव पाटीलांनी (Gulabrao Patil) देशाच्या खासदार हेमा मालिनी यांच्याविषयी वक्तव्य केलं ते आपत्तीजनक नव्हतं ? ते विनयभंगामध्ये बसत नाही का ? शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे सर्वज्ञानी, यांनी सगळ्या प्रसिद्धी माध्यमांसमोर भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना शिव्या दिल्या, त्या शिव्या घराघरांत पोहोचल्या, ते आपत्तीजनक नाही का ? त्यामुळं त्यांच्यावर गुन्हा दाखल करा. ही मागणी आम्ही केली आहे," असंही चित्रा वाघ म्हणाल्या..

Edited By - Amit Golwalkar

हे देखिल पहा-

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kolhapur Politics: मधुरिमाराजेंच्या माघारीची INSIDE STORY; कोल्हापूर उत्तर मतदारसंघात काय घडलं?

Assembly Election: एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंमध्ये संघर्ष; शिंदेविरुद्ध दोन ठाकरे

Maharashtra Election: महायुतीनं केलंय काम भारी! लाडक्या बहिणींना मिळणार २१०० रुपये, कोल्हापुरात महायुतीची १० वचनं

Maharashtra News Live Updates: भाजपचा मनसेचे उमेदवार बाळा नांदगावकर यांना पाठिंबा

Uddhav Thackeray: पीएम मोदींच्या अशुभ हातांनी बांधलेला पुतळा पडला'; उद्धव ठाकरेंची टीका

SCROLL FOR NEXT