Urfi Javed And Chitra Wagh  Saam Tv
महाराष्ट्र

Chitra Wagh On Urfi Javed: 'ही बाई सापडेल त्या दिवशी तिचं थोबाड रंगवेन अन्...' उर्फी जावेदवर चित्रा वाघ संतापल्या

अशा उघड्या नागड्या फिरणाऱ्या मुली महाराष्ट्रात चालणार नाहीत, ही बाई ज्या दिवशी सापडेल त्या दिवशी तिचे थोबाड रंगवेन असा ईशारा चित्रा वाघ यांनी दिला आहे.

Gangappa Pujari

Chitra Wagh: भाजपा नेत्या चित्रा वाघ आणि उर्फी जावेदमध्ये गेल्या काही दिवसांपासून चांगलीच जुंपली आहे. काही दिवसांपुर्वीच चित्रा वाघ यांनी उर्फी जावेदवर टीका करताना ह्या बाईला आवरा म्हणत तिच्यावर जोरदार टीका केली होती. त्यानंतर चित्रा वाघ यांच्या या वक्तव्याला उर्फी जावेदनेही जोरदार प्रत्यूतर देत राजकारणी लोकांना काही काम राहिले नाही, असे वक्तव्य केले होते. त्यानंतर आता चित्रा वाघ यांनी उर्फी जावेदवर सडकून टीका केली आहे. (BJP)

याबाबत अधिक माहिती अशी की, भाजपा नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी उर्फी जावेदने केलेल्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला. ज्यामध्ये त्यांनी आम्ही काय करतो हे उर्फी सारख्या बाईला सांगण्याची गरज मला वाटत नाही. महाराष्ट्रात असा नंगा नाच चालणार नाही. संस्कृतीचे गोडवे गाणाऱ्यांना हे दिसत नाही का, आम्ही पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. यावर आम्ही कारवाई केल्याशिवाय शांत बसणार नाही, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.

याबद्दल पुढे बोलताना चित्रा वाघ यांनी, अशा उघड्या नागड्या फिरणाऱ्या मुली महाराष्ट्रात चालणार नाहीत, ही बाई ज्या दिवशी सापडेल त्या दिवशी तिचे थोबाड रंगवेन, आणि नंतर ट्विट करत तुम्हाला काय झालं ते सांगेन असेही यावेळी सांगितले.

दरम्यान यावेळी गौतमी पाटीलबद्दल विचारले असता चित्रा वाघ यांनी मी अजुन तिचा डान्स बघितला नाही, असा खुलासा त्यांनी केला. चित्रा वाघ यांच्या या इशाऱ्यानंतर उर्फी जावेद आणि चित्रा वाघ यांच्यातील वाद आता चांगलाच पेटणार असल्याची चिन्हे निर्माण झाली आहेत

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Crime News : मीरारोडमध्ये मोठा राडा! मुलीच्या छेडछाडीवरून दोन गटात हाणामारी; २० रिक्षांची तोडफोड

Kapoor Family: फॅम जॅम...! बॉलिवूडच्या कपूर खानादानाचा रॉयल दिवाळी फेस्ट लूक

Relationship Tips: सणासुदीला नवरा-बायकोमध्ये भांडणं का होतात? जाणून घ्या कारणे आणि उपाय

Maharashtra Politics: ऐनदिवाळीत राजकीय वादाचा धमाका! माजी आमदारांच्या प्रवेशांवरून भाजपात फुटला वादाचा बॉम्ब; निष्ठावंतांची नाराजी

Maharashtra Live News Update : विरारमध्ये अग्नीतांडव! फर्निचर दुकानं जळून खाक

SCROLL FOR NEXT