Chandrashekhar Bawankule, Uddhav Thackeray,  saam tv
महाराष्ट्र

Chandrashekhar Bawankule: 'शिमग्याच्या बोंबा पुरे...' उद्धव ठाकरेंच्या 'त्या' टीकेनंतर बावनकुळेंचा हल्लाबोल; 'तुम्ही CM असताना...'

Thackeray Group Rally: आजच्या खेडमधील सभेत उद्धव ठाकरेंनी शिंदे- फडणवीस सरकारवर सडकून टीका केली होती, ज्यानंतर बावनकुळेंनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Chandrashekhar Bawankule Tweet: ठाकरे गटाचे प्रमूख उद्धव ठाकरे( Udhav Thackeray) यांची झंझावाती सभा आज खेडमध्ये पार पडली. शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा निकाल लागल्यानंतर उद्धव ठाकरेंची ही पहिलीच जाहीर सभा होती. या सभेमध्ये त्यांनी निवडणूक आयोग, पंतप्रधान नरेंद्र मोदींसह शिंदे- फडणवीस सरकारवर सडकून केली. तसेच भाजपच्या मंचावर पुर्वी साधू दिसायचे, आता फक्त संधीसाधू दिसतात, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.

उद्धव ठाकरेंच्या या टीकेनंतर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ट्विट करत उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला आहे... (Maharashtra Politics)

काय म्हणाले होते उद्धव ठाकरे....

खेडमध्ये झालेल्या सभेत उद्धव ठाकरेंनी शिंदे- फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. हिंदुत्वाला धुमारे फुटत असताना शिवसेना फोडण्यात आली. नाहीतर भाजपाला गल्लीतलं कुत्रं विचारत नव्हतं.” असे म्हणत भाजपाच्या मंचावर आधी साधू दिसायचे, आता संधीसाधू बसतात, अशी टीका त्यांनी केली होती.

चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट...

उद्धव ठाकरेंच्या या टिकेला चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. "पालघरची घटना इतक्यात विसरलात? उद्धवजी, तुम्ही मुख्यमंत्री असताना निष्पाप साधूंच्या हत्या झाल्या. मारेकऱ्यांना तुम्ही पोटाशी धरले. रक्ताचे पाट तुमच्याच कारकिर्दीत वाहिले. शिमग्याच्या बोंबा पुरे आता," अशा शब्दात त्यांनी ट्विटरवरुन निशाणा साधला आहे.

दरम्यान, उद्धव ठाकरेंनी आजच्या खेडमधील सभेत एकनाथ शिंदेवरही जोरदार निशाणा साधला. मी घरी बसून महाराष्ट्र सांभाळला, यांना देशभर फिरुन, गुवाहाटीला जाऊन तो सांभाळता येत नाही, यांचा अर्धा वेळ तर दिल्लीत मुजरा करायला जातोय अशी टीका उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली. तसेच शिवसेनेची स्थापना निवडणूक आयोगाच्या वडिलांनी नाही, तर माझ्या वडिलांनी केली आहे,” असं म्हणत नाव न घेता पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्ला चढवला. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Palghar News: संपानं घेतला चिमुकलीचा जीव; उपचाराअभावी २ वर्षीय मुलीचा मृत्यू,शासकीय रुग्णालयातील धक्कादायक प्रकार

Raj Thackeray : राज ठाकरे महाविकास आघाडीत येणार? महाराष्ट्रात राजकीय हालचालींना वेग, मातोश्रीच्या बैठकीत काय घडलं? VIDEO

Israel Airstrike: गाझा-युद्धविरामची चर्चा सुरू असतानाच इस्रायलचा कतरमध्ये हवाई हल्ला, व्हिडिओ व्हायरल

Maharashtra Government: शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज; रस्त्यावरून होणारी कटकटी अन् भांडणं मिटणार, शेतापर्यंत होणार रस्ता

Maharashtra Politics : राज्यात पुन्हा भूकंप; दसऱ्यानंतर ठाकरे गट फुटणार? VIDEO

SCROLL FOR NEXT