Chandrashekhar Bawankule, Uddhav Thackeray,
Chandrashekhar Bawankule, Uddhav Thackeray,  saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics News: 'उद्धव ठाकरे दुतोंडी...' चंद्रशेखर बावनकुळेंचा घणाघात; राहुल गांधींच्या वक्तव्यावरुन साधला निशाणा

मंगेश कचरे

Baramati News: कॉंग्रेस नेते (Congress) राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल केलेल्या वक्तव्यावरुन राजकारण चांगलेच तापले आहे. खासदारकी रद्द झाल्यानंतर राहुल गांधींनी पत्रकार परिषद घेत भाजपवर निशाणा साधला होता. यावेळी त्यांनी माफी मागायला नाही, मी सावरकर नाही, असे वक्तव्य केले होते. त्यांच्या या विधानावरुन भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे.

राहुल गांधींच्या या वक्तव्यावरुन भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे. (Latest Marathi News)

काय म्हणाले चंद्रशेखर बावनकुळे...

राहुल गांधी यांच्या सावरकरांबद्दल केलेल्या वक्तव्यावरुन उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) यांनी कॉंग्रेसला मालेगावच्या सभेतून जोरदार इशारा दिला होता. सोबत लढत असलो तरी सावरकरांचा अपमान सहन करणार नाही, असे ते म्हणाले होते. उद्धव ठाकरे यांच्या याच वक्तव्यावरुन चंद्रशेखर बावनकुळेंनी (Chandrashekhar Bawankule) निशाणा साधला आहे.

"एकीकडे मांडीला मांडी लावून बसता आणि दुसरीकडे त्यांनी केलेला अपमान सहन करायचा नाही म्हणता असं म्हणतं उध्दव ठाकरे हे दुतोंडी आहेत," असा घणाघात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांवर केला आहे. तसेच यावेळी बोलताना "आम्ही सावरकरांचा अपमान सहन करणार नाही, असे म्हणता तर मग त्यांच्या मांडीला मांडी लावून तुम्ही का बसला आहात?" असा सवालही चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपस्थित केला.

बावनकुळेंनी आपल्या 52 कुळा जरी खाली आणल्या तरी देखील शिवसेना आणि ठाकरे ते वेगळे करू शकणार नाहीत, अशी टीका मालेगावमध्ये उद्धव ठाकरेंनी केली होती. त्यांच्या या टीकेलाही चंद्रशेखर बावनकुळे यांनी जोरदार प्रत्यूत्तर दिले आहे.

"माझ्या कुळाचा उल्लेख करून उद्धव ठाकरेंना आनंद मिळतोय. माझ्या कुळाचा उल्लेख करतात यावरूनच ते किती घाबरलेत हे दिसत आहे. पुढे महाराष्ट्रात काय होतंय ते पहा. आजचे उरलेसुरले आहेत त्यातील चारच राहतील. आम्ही हिंदुत्वाचे रक्षण करणारे कार्यकर्ते आहोत तुमच्यासारखे पळपुटे नाही," अशा शब्दात बावनकुळेंनी उद्धव ठाकरेंच्या त्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. (Maharashtra Politics)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics 2024 : आम्ही कायम भांडत रहावं आणि...; आदित्य ठाकरेंच्या आरोंपांवर दीपक केसरकरांचा पलटवार

Today's Marathi News Live : उजनी धरणातून 10 मे रोजी सोलापूर शहरासाठी पाणी सोडण्यात येणार

Health Tips: सकाळी आंघोळीच्या पाण्यात 'ही' एक गोष्ट मिसळा; आरोग्यासाठी ठरेल फायदेशीर

Vijay Wadettiwar : विजय वडेट्टीवार यांच्या वक्तव्याविरोधात भाजप युवा मोर्चा आक्रमक; नागपुरातील निवास्थानाबाहेर निदर्शने

Mumbai News: नोकरीसाठी मराठी माणूस नको,पोस्ट व्हायरल झाल्यानंतर कंपनीने मागितली माफी; काय आहे प्रकरण

SCROLL FOR NEXT