Baramati Lok Sabha 2024 Election saam tv
महाराष्ट्र

Baramati Lok Sabha : बारामती लोकसभेसाठी महायुतीचा उमेदवार कोण? भाजप नेत्याने थेट नावच सांगून टाकलं

Satish Daud

Baramati Lok Sabha 2024 Election

लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना रंगणार आहे. सध्या दोन्ही बाजूंचे नेते जागावाटपावरून चर्चा करीत आहेत. बारामती लोकसभेची जागा महायुतीकडून कोण लढणार? यावर अद्यापही निर्णय झालेला नाही. अशातच भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी बारामती लोकसभेबाबत मोठं विधान केलं आहे. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

भाजप नेते आणि विद्यमान मंत्री चंद्रकांत पाटील सध्या बुलढाणा दौऱ्यावर आहेत. यावेळी आज (ता. १४) त्यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी लोकसभा उमेदवारांच्या दोन याद्या अत्यंत विचारपूर्वक आणि जनतेच्या पाठींबा लक्षात घेऊन जाहीर केल्या आहेत. स्थानिक पातळीवर ज्यांच्यावर विश्वास आहे असेच उमेदवार देण्यात आल्याचं चंद्रकांत पाटलांनी सांगितलं आहे.

भाजपाचा प्रत्येक उमेदवाराचा सर्व्हे केला जातो आणि त्यानुसार उमेदवारी दिली जाते. महाराष्ट्रात भाजपकडून लोकसभेच्या पहिल्या २० जागा जाहीर झाल्या आहेत. आता अतिरिक्त ४ जागा मिळतील, त्यावर वरिष्ठ विचार करतील, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. (Latest Marathi News)

बारामतीतून महायुतीचा लोकसभेचा उमेदवार कोण असणार? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता, बारामतीची जागा अजित पवार यांना (Ajit Pawar) दिली आहे. घोषित करण्याची गरज नाही असं चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट सांगितलं आहे. त्यांच्या या विधानाने बारामतीत सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार असा सामना रंगणार, हे जवळपास निश्चित झालंय.

बारामती म्हणजे पवार कुटुंबीयांचा बालेकिल्ला आहे. पण पक्षातील फुटीमुळे आता याच बारामतीत दोन्ही कुटुंब एकमेकांविरोधात उभं ठाकल्याचं चित्र पाहायला मिळण्याची शक्यता आहे. त्यातच बारामती निवडणुकीत आणखी एक ट्वीस्ट आला आहे. पुरंदरचे माजी आमदार विजय शिवतारे अपक्ष निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे बारामतीत कोण बाजी मारणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India vs Pakistan: आज जिंकावंच लागेल! पाकिस्तानविरूद्ध 'या' चुका करणं टीम इंडियाला पडणार महागात

Marathi News Live Updates : एसटी बस थांब्यावरून विद्यार्थ्यांचे रस्त्यावर बसून ठीय्या आंदोलन

Viral Video: वाह गुरु! गणित शिकवण्याचा शिक्षकाचा अनोखा फंडा; असा जुगाड तुम्ही कधीच पाहिला नसेल

Nikki Tamboli : निक्कीला फुल्ल सपोर्ट करा, बिग बॉसची ट्रॉफी आपलीच; नंदुरबारकरांनी काढली मिरवणूक

Maharashtra Politics : आमदार रोहित पवारांचा नवा डाव; चुलत्यावर टीका तर पुतण्याबरोबर गुप्तगू

SCROLL FOR NEXT