Police investigation underway after a BJP worker was brutally attacked in Dharashiv district, Maharashtra Saam Tv
महाराष्ट्र

भाजपच्या बड्या नेत्याला काठ्या, लोखंडी गजाने मारहाण, राजकीय वर्तुळात खळबळ

BJP Worker Attacked With Iron Rods In Dharashiv Maharashtra: धाराशिव जिल्ह्यात भाजप कार्यकर्त्यावर जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. लोखंडी गज व काठ्यांनी मारहाण करत आरोपींनी लूट केल्याचा आरोप असून राजकीय वातावरण चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Omkar Sonawane

बालाजी सुरवसे, साम टीव्ही

धारशिव जिल्ह्यातील परंडा तालुक्यातील शेळगावजवळ चिंचपूर (बु.) शिवारात भाजपच्या एका कार्यकर्त्यावर गाडी अडवून जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हल्ल्यात भाजप कार्यकर्ता धनाजी निवृत्ती अंचेवाड (वय ३५) गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर बार्शी येथील खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

गुरुवारी ५ फेब्रुवारी रोजी रात्री सुमारे १० वाजण्याच्या सुमारास धनाजी अंचेवाड हे आपल्या सहकाऱ्यांसोबत चारचाकी वाहनातून जात असताना सावंत वस्ती परिसरात पांढऱ्या रंगाच्या स्कॉर्पिओ गाडीने त्यांचा पाठलाग केला. संशय आल्याने अंचेवाड यांनी गाडी थांबवून जाब विचारला असता, स्कॉर्पिओमधील चार जणांनी त्यांच्यावर हल्ला चढवला.

आरोपींनी काठ्या आणि लोखंडी गजाच्या सहाय्याने डोक्यावर, हातापायांवर जबर मारहाण केली. या हल्ल्यात अंचेवाड यांचा हात आणि पाय फॅक्चर झाला आहे. मारहाणीनंतर आरोपींनी जिवे मारण्याची धमकी देत त्यांची सोन्याची अंगठी, दोन मोबाईल आणि खिशातील ३५ हजार रुपये लंपास केल्याचा आरोप आहे.

या प्रकरणी नातेवाईकांनी राजकीय वादातून काँग्रेस कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याचा आरोप केला असून आंबी पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींमध्ये महेश अंकुश शिंदे, अशोक अनभुले (दोघे रा. चिंचपूर बु.) आणि अन्य दोन अज्ञात व्यक्तींचा समावेश आहे. पोलीसांनी पाठलागासाठी वापरलेली स्कॉर्पिओ गाडी जप्त केली असून, गाडीत काठ्या व कुराडी आढळल्याने ऐन निवडणूक काळात परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक खचकड करत असून राजकीय वातावरण अधिक चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fish bone stuck in throat: घशामध्ये माशाचा काटा अडकल्यास काय कराल?

Pune : राक्षस! ४ वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करून हत्या; नराधम आरोपीची 'डर्टी हिस्ट्री' वाचून तुमचाही थरकाप उडेल

Famous Actor Death : प्रसिद्ध अभिनेत्याचे निधन; रेस्टॉरंटमध्ये आढळला मृतदेह, मनोरंजन विश्वावर शोककळा

Gold Price Today : आज पुन्हा सोन्याचे दर बदलले, खरेदीआधी वाचा 22k,24k,18k सोन्याचे ताजे दर

Maharashtra News Live Update: श्रीवर्धन म्हसळा रोडवर पिक अप आणि ट्रेलरचा अपघात

SCROLL FOR NEXT