Ashish Deshmukh Saam Tv
महाराष्ट्र

Ashish Deshmukh : आशिष देशमुख यांच्या सुरक्षेत वाढ; घराबाहेर Y दर्जाची सुरक्षा

Ashish Deshmukh Y Category is a Security : आशिष देशमुख सावनेर मतदारसंघातून अनुजा सुनील केदार यांच्या विरोधात निवडणूक लढवण्याची दाट शक्यता आहे.

Ruchika Jadhav

पराग ढोबळे, नागपूर

भाजप नेते आशिष देशमुख यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. त्यांच्यासोबत एक पोलीस उपनिरीक्षक आणि तीन पोलीस कर्मचारी अशी Y दर्जाची सुरक्षा व्यवस्था देण्यात आली आहे. तर घरीही सशस्त्र पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

आशिष देशमुख सावनेर मतदारसंघातून अनुजा सुनील केदार यांच्या विरोधात निवडणूक लढवण्याची दाट शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर आशिष देशमुखांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

2009 मध्ये आशिष देशमुख यांनी सावनेर विधानसभा मतदारसंघातून सुनील केदार यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. तेव्हा आशिष देशमुख यांचा 3000 मतांनी पराभव झाला होता.

सुनील केदार यांना न्यायालयाने दोषी ठरवलं पाच वर्षाची शिक्षा देखील देण्यात आली 22 वर्षानंतर 1444 कोटी रुपयांची वसुली हे त्यांच्याकडून होण्यासंदर्भात सहकार विभागाने आणि सहकारमंत्र्यांनी दिरंगाई केली, असा आरोपही आशिष देशमुख यांनी केला होता. तसेच या विरोधात १९ ऑक्टोबरला नागपूरच्या रामटेक तालुक्यात पीडित शेतकऱ्यांचा आणि खातेधारकांचा मोर्चा आयोजित करण्यात आला होता.

नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या घोटाळ्यामध्ये सुनील केदार यांच्यावर आशिष देशमुखांकडून सातत्याने टिकास्त्र सोडलं जात आहे. काही दिवसांपूर्वी आशिष देशमुख यांनी या प्रकरणात वळसे पाटील वेळ काढत आहेत, असं म्हटलं होतं. सुनील केदार यांचे दिलीप वळसेंसोबत असलेले जुने संबंध आणि अनिल देशमुख यांचे धनंजय मुंडेंसोबत असलेले जुने संबंध यातून वेळ काढूपणा होत आहे. मात्र यामुळे विदर्भाच्या शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे. शेतकरी अडचणीत असताना सुद्धा ते मंत्री कारवाई करण्यात टाळाटाळ करतात. दिलीप वळसे पाटील आणि धनंजय मुंडे यांनी आमची शेतकऱ्यांची हाक ऐकावी आणि त्यांना न्याय देण्यासाठी कार्यवाही करावी, अशी विनंती आशिष देशमुख यांनी केली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: दिवंगत पद्मश्री डॉ डी वाय पाटील यांना कोल्हापूर पोलीस दलाच्या वतीने मानवंदना

Health Care : सतत थकल्यासारखे वाटते का? ' ही' ५ गंभीर लक्षणे फॅटी लिव्हरची असू शकतात, वेळीच ओळखा

Vaidehi Parshurami: पैठणीत खुललं वैदेही परशुरामीचं सौंदर्य; सोज्वळ सौंदर्याने जिंकली चाहत्यांची मनं

Live Update : निवडणूक चिन्ह कुणाचे? राजकीय पक्षाचे की विधिमंडळपक्षाचे? सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा प्रश्न

Baba Vanga Prediction: 5 ते 9 ऑगस्टदरम्यान 'या' 5 राशींवर होणार पैशांचा वर्षाव? पाहा तुमची रास आहे का

SCROLL FOR NEXT