BJP leader Annamalai during a campaign event in Mumbai amid political controversy. Saam Tv
महाराष्ट्र

मुंबई महाराष्ट्राची नाही, भाजप नेत्यानं ओकली गरळ

Mumbai Bmc Election Bjp Annamalai Controversy: मुंबई महापालिका निवडणुकीतील प्रचार शिगेला पोहचलाय. आर्थिक राजधानी मुंबई ताब्यात घेण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये घमासान युद्ध सुरु आहे. त्यातच एका भाजप नेत्याने मुंबईबाबत केलेल्या वक्तव्याने आगीत तेल ओतलं गेलंय. पाहूया भाजप नेत्यानं काय गरळ ओकलीये आणि त्यावर कशा प्रतिक्रीया उमटल्यात.

Snehil Shivaji

ऐकलंत.. हा आहे भाजपचा तोल सुटलेला अण्णा.. जो तामिळनाडू भाजपचा प्रदेशाध्यक्ष राहिलेला आहे. या भाजप प्रदेशाध्यक्षानं आपल्या अकलेचे तारे तोडत केवळ आणि केवळ सत्ता मिळवण्यासाठी 106 हुतात्मांच्या अपमान केलाय. त्यानं काय म्हटलं हे पुन्हा एकदा ऐका

महाराष्ट्रातील तमाम मराठींचा, दिवस रात्र घाम गाळून मुंबईचं नाव करणाऱ्या कोट्यवधी मुंबईकरांना कसं अपमानित केलंय. मुंबई ही महाराष्ट्राची नाही तर मुंबई आंतराष्ट्रीय आहे अशी गरळ ओकून या अण्णामलईनं आपल्या अकलेचं प्रदर्शन केलंय. मुंबई मध्ये मोठ्या प्रमाणात परप्रांतिय मतदार आहेत तेव्हा या मतदारांना आपल्या बाजूनं वळवण्यासाठी देशभरातील नेत्यांना स्टार प्रचारक म्हणवून भाजपनं मुंबईच्या गल्लीबोळात फिरवण्याचं ठरवलंय. तेव्हा मुंबईत तेजिंदर सिंह तिवाना यांच्यासोबत मतं मागत फिरणाऱ्या या अण्णानं हे वक्तव्य केल्यानंतर राजकीय वर्तुळात तीव्र पडसाद उमटलेत.

निवडणुकीच्या प्रचारात मतांसाठी नेत्यांकडून अनेक प्रलोभनं दाखवणारी वक्तव्य केली जातात पण अस्मितेला दुखावणारी वक्तव्य करुन कोणात्या मतदारांची मतं आपल्या पारड्यात पाडून घ्यायची आहेत असा प्रश्न उपस्थित झालाय. त्याला कारण आहे भाजपच्या नेत्यांनी या आधीही केलेली बेजबाबदार वक्तव्य.

आधी कृपाशंकर सिंह आणि आता हा अण्णामलाई यांचं हे वक्तव्य मराठी माणसाच्या मनावरचा घाव आहे. सत्ताधाऱी पक्षाच्या नेत्यांच्या अशा वक्तव्यानंतर मराठी माणूस या नेत्यांना 15 तारखेला कोणती जागा दाखवतो हे पाहणं महत्वाचं ठरेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नाशिक दत्तक घेणाऱ्या फडणवीसांनी काय केलं? राज ठाकरेंच्या टीकेनंतर देवाभाऊंनी यादीच वाचून दाखवली|VIDEO

Maharashtra Live News Update : जळगाव महापालिका निवडणुकीतील प्रभाग पाच मधील ठाकरेंच्या सेनेच्या उमेदवाराचा चक्क अपक्ष उमेदवाराला पाठिंबा..

Love Tragedy : प्रेमाचा दुर्दैवी अंत! धावत्या वंदे भारत एक्सप्रेससमोर उडी मारून प्रेमीयुगुलाने संपवलं जीवन; धक्कादायक कारण आलं समोर

Daily Wear Saree Designs: डेली वेअरसाठी या आहेत युनिक आणि ट्रेडिंग 5 साड्या

Daily Yoga Workout: फिट राहण्यासाठी रोज करा हे 4 योगा

SCROLL FOR NEXT