Shreya Maskar
रेवा किल्ला ज्याला 'रिवा किल्ला' किंवा 'काला किल्ला' / 'ब्लॅक फोर्ट' म्हणूनही ओळखले जाते. रेवा किल्ला मध्य मुंबईत मिठी नदीच्या काठावर धारावी परिसरात वसलेला आहे.
रेवा किल्ला धारावी परिसरात स्थित असून 'काला किल्ला बस डेपो'च्या अगदी मागे लपलेला आहे. वीकेंडला सुट्टीत या ठिकाणाला नक्की भेट द्या.
रेवा किल्ला हा १७ व्या शतकातील ब्रिटिश टेहळणी बुरूज आणि मिठी नदीकाठची संरक्षण चौकी म्हणून बजावलेल्या ऐतिहासिक भूमिकेसाठी विशेष प्रसिद्ध आहे.
रेवा किल्ला आज मात्र धारावीच्या झोपडपट्ट्यांमध्ये जवळजवळ पूर्णपणे लपलेला आहे. मात्र हे महत्त्वाचे ऐतिहासिक ठिकाण आहे.
रेवा किल्ला हा किल्ला बॉम्बे (आताची मुंबई) शहराच्या उत्तर सीमेवर ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीने बांधलेल्या आणि शहराचे रक्षण करणाऱ्या तटबंदीच्या साखळीचा एक भाग होता.
मुंबईतील रेवा किल्ला याला 'काळा किल्ला' असे नाव केवळ त्याच्या बांधकामासाठी वापरलेल्या गडद, काळ्या दगडांमुळेच पडले आहे.
मुंबईत अनेक किल्ले वसलेले आहेत. यात वांद्रे किल्ला, वरळी किल्ला, सायन किल्ला, शिवडी किल्ला, माहिम किल्ला यांचा समावेश आहे.
वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.