Chandrakant Patil  Saam tv
महाराष्ट्र

Chandrakant Patil : आमची चूक मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर करावी; मराठा आरक्षणावरून चंद्रकात पाटील थेट बोलले

Chandrakant Patil On Maratha Reservation : मराठा आरक्षणावरून चंद्रकात पाटील यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.चंद्रकांत पाटील यांनी थेट मनोज जरांगे पाटील यांना सवाल केला आहे.

विजय पाटील साम टीव्ही सांगली

सांगली : ऐन विधानसभा निवडणुकीत मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. मराठा आरक्षणाचा मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. मराठा आरक्षणावरून राजकीय पक्षातील बडे नेते मनोज जरांगे पाटील यांची भेट घेत आहेत. त्यामुळे या विधानसभेत मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजणार आहे, हे निश्चित झालं आहे. एकीकडे मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे यांच्याकडून सत्ताधाऱ्यांवर टीका केली जात आहे. याचदरम्यान, मराठा आरक्षणावरून चंद्रकांत पाटील यांनी भाष्य केलं आहे.

चंदक्रांत पाटील सध्या सांगलीच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान, चंद्रकांत पाटील यांनी राज्यातील विविध राजकीय घडामोडींवर भाष्य केलं. चंद्रकांत पाटील म्हणाले, 'आमचं चुकलं काय? कधी न दिलेले आरक्षण देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे. उद्धव ठाकरे यांच्या काळात आरक्षण गेले. एकनाथ शिंदे यांच्या काळात दिले हे चुकलं का? राज्यात ७८ हजार कुणबी नोंदी सापडल्या आहेत. या सगळ्यात आमची चूक झाली का? जरांगे समजून घेणार नसतील तर सामन्य मराठा समाज समजून घेईल. मनोज जरांगे यांनी खऱ्याला खरे म्हणायला शिका. आम्ही अजूनही कागदपत्रे घेऊन चर्चेला बसायला तयार आहे. आमचं चुकलं काय, हे त्यांनी जाहीर करावं'.

वसंत देशमुख यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर भाष्य करताना चंद्रकांत पाटील म्हणाले, 'एखाद्या व्यक्तीनं म्हणणे हा त्याचा व्यक्तीचा दोष असू शकतो. ती आमच्या पक्षाची संस्कृती नाही. जे देशमुख बोलले, त्या सर्वांना समजण्यात आलं आहे. आपल्या बोलण्यात सर्वांनीच आदर व्यक्त केला पाहिजे'.

विधानसभेत विजय होईल, असा विश्वास चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला. 'राज्यात पराभूत १७ लोकसभा मतदारसंघातील १३० विधानसभेत भाजपच पुढे आहे. त्यामुळे आम्ही पिछाडीवर आहोत, याबाबत विरोधक हवेत आहे. याचा आम्हालाच फायदा होईल, असे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केलं.

मराठा आरक्षणावर मुरलीधर मोहोळ काय म्हणाले?

मराठा आरक्षणावर मुरलीधर मोहोळ म्हणाले, 'महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचं आंदोलन जोर धरत आहे. या पूर्वीही मोठी आंदोलने झाली आहेत. पण याच काळात पश्चिम महाराष्ट्रातील मुख्यमंत्री झाले, पण कोणी आरक्षण दिले नाही. शरद पवार ४ वेळा मुख्यमंत्री होते, पण आरक्षण दिले नाही'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: संगमनेरमध्ये स्कूल बसला अपघात

Mumbai Police News : आलिशान कारमधून आले अन् टपरी चालकाला उचलून नेलं, मुंबईतील २ पोलिसांना बेड्या

Maharashtra Politics: मीरा-भाईंदरमध्ये भाजपला मोठा धक्का, मराठी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्याचा मनसेत प्रवेश|VIDEO

Abhijeet Khandkekar Wife: फेसबुकवर मैत्री नंतर लग्न केलं; कोण आहे अभिजीत खांडकेकरची पत्नी?

कार मंदिरात घुसली; ५-६ जणांना चिरडलं, दोघांचा मृत्यू, पायऱ्यांवर रक्ताच्या थारोळ्या | Chhatrapati Sambhajinagar

SCROLL FOR NEXT