Sharad Pawar Saam Tv
महाराष्ट्र

PoliticaL News : म्हणून शरद पवारांना भाजपकडून लक्ष्य केलं जात आहे...; राष्ट्रवादीच्या बड्या आमदाराचा गौप्यस्फोट

सत्ताकारणाची भितीही वाटत नाही, असे म्हणत मोहितेपाटीलांनी भाजपाला खडेबोल सुनावलेत.

रोहिदास गाडगे

Shrad Pawar : राज्यातल्या राजकारणातील समीकरण बदलाची चर्चा माध्यमांमधूनच ऐकायला मिळत आहे. तसेच पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकाही आमदाराला अजित पवारांनी कुठल्याच सूचना दिल्या नसल्याचे खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटल यांनी स्पष्ट केलं आहे. (Marathi News)

अडीच वर्षांपूर्वी भाजपाला लक्ष्य करत भाजपाची सत्ता घालविण्यात पवारांचा मोठा वाटा राहिल्याने भाजपाकडून शरद पवारांना लक्ष्य केलं जात असल्याचा गौप्यस्फोट आमदार दिलीप मोहिते पाटलांनी केलाय.

सत्तेच्या राजकारणात शरद पवार काय करु शकतात याची पूर्ण कल्पना भाजपाला असल्याने सातत्याने राष्ट्रवादी कॉग्रेस आणि शरद पवारांना अडचणीत आणण्याचे काम भाजपाकडून होत असल्याचा आरोपही मोहिते पाटीलांनी केलाय.

चुकीच्या पद्धतीने वागल्यास सत्तेतून बाहेर पडावं लागत असल्याची उदाहरणे देत सत्तांतर घडविण्याची ताकद लोकांमध्ये असते आणि सत्तेचा उपयोग लोकहितासाठी केला तर असे काही करावे लागत नाही. किंबहुना सत्ताकारणाची भितीही वाटत नाही, असे म्हणत मोहितेपाटीलांनी भाजपाला खडेबोल सुनावलेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kishor Kadam : किशोर कदम यांचे राहते घर धोक्यात; सरकारला केली विनंती, नेमकं प्रकरण काय?

दुहेरी हत्याकांडाने ठाणे हादरलं, भाजप नेत्याची कार्यलयातच हत्या, भिवंडीत रात्री ११ वाजता काय घडलं?

खोटं धर्मांतरण करून दुसरं लग्न, पोलीस कर्मचाऱ्याला सेवेतून बडतर्फ; धुळ्यात खळबळ

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींना ऑगस्टचा हप्ता कधी येणार? संभाव्य तारीख आली समोर

Viral Video : कानाखाली मारली, केस ओढले, मुलाकडून जन्मदात्याला घरातच अमानुष मारहाण, 2 मिनिटाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

SCROLL FOR NEXT