Jalna: ''नाना पटोलेंची जीभ कापा अन् 1 लाखांचं बक्षीस मिळवा!'' Saam TV
महाराष्ट्र

Jalna: ''नाना पटोलेंची जीभ कापा अन् 1 लाखांचं बक्षीस मिळवा!''

दरम्यान नाना पटोलेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात मारण्याची आणि शिव्या देण्याची भाषा केल्याचा आरोप करत आज राज्यभर भाजपाच्यावतीने आंदोलन सुरु आहे.

लक्ष्मण सोळुंके

जालना: महाराष्ट्रातून कुणीही कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची जीभ कापा आणि 1 लाख लाख रुपये मिळवा अशी घोषणा भाजपा युवा मोर्चाचे जालना जिल्हाध्यक्ष सुजित जोगस यांनी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात नाना पटोले यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्या प्रकरणी कदीम जालना पोलिस ठाण्यात नाना पटोले यांच्या विरोधात भाजपा युवा मोर्चाने तक्रार दाखल केली असून तातडीने त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा असंही या तक्रारीत म्हटलं आहे. महाराष्ट्रात नारायण राणे (Narayan Rane) यांच्यासाठी वेगळा कायदा आणि नाना पटोले (Nana Patole) यांच्या साठी वेगळा कायदा आहे का? असा सवाल देखील भाजपा युवा मोर्चाच्या वतीने उपस्थित करण्यात आला आहे.

दरम्यान नाना पटोलेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात मारण्याची आणि शिव्या देण्याची भाषा केल्याचा आरोप करत आज राज्यभर भाजपाच्यावतीने आंदोलन सुरु आहे. नागपूर, मुंबईमध्ये भाजपच्या नेत्यांना ताब्यातही घेण्यात आले आहे. परंतु नाना पटोलेंनी आपण गावातील एका गाव गुंडाबाबत बोलत असल्याचे म्हटले आहे. पोलीस त्याची चौकशी करत आहेत त्यांना जर काही चूकीचं आढळलं तर त्यांनी कारवाई करावी असेही पटोले म्हणाले आहेत.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs AUS: दुष्काळात तेरावा महिना...सराव सामन्यात संघातील प्रमुख फलंदाज दुखापतग्रस्त

Maharashtra News Live Updates: एकनाथ शिंदे उद्या रत्नागिरी दौऱ्यावर, तीन सभा घेणार

Maharashtra Election : नाकाबंदी सुरू होती, कारमध्ये सापडलं घबाड, जळगावात २० लाख कॅश पकडली, आतापर्यंत ४ कोटी जप्त

Bigg Boss 18: सलमानच्या बिग बॉसमध्ये लागणार तडका; किम कार्दशियन घेणार वाइल्डकार्ड एन्ट्री?

VIDEO : आमदार शहाजी बापू पटलांचं मतदारांना भावनिक आवाहन; म्हणाले... | Marathi News

SCROLL FOR NEXT