nashik News Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics : नाशिकमध्ये वातावरण फिरलं; भाजपला मोठा धक्का, बडा नेता ठाकरे गटात जाणार

Maharashtra Political News update : नाशिकमध्ये वातावरण फिरल्याचं दिसत आहे. शहरात भाजपला मोठा धक्का बसला आहे. शहरातील बडा नेता ठाकरे गटात जाणार आहे.

Vishal Gangurde

भाजपचे माजी मंडलाध्यक्ष हेमंत गायकवाड आणि माजी नगरसेविका संगीता गायकवाड ठाकरे गटात प्रवेश करणार

ठाकरे गटाचे नेते दत्ता गायकवाड यांच्या मध्यस्थीने पक्षप्रवेश

नाशिकमधील गायकवाड दाम्पत्याच्या ठाकरे गटात जाण्याने भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता

ठाकरे गटातही सध्या इनकमिंग वाढल्याचे दिसत आहे

नाशिक महापालिका निवडणुकीसाठी भाजपने कंबर कसली आहे. भाजपने शहरात 'शंबर प्लस'चा नारा दिलाय. शहरात भाजपमध्ये मोठी इनकमिंग वाढलेली असताना मोठा धक्का बसला आहे. शहरातील बडा नेता ठाकरे गटात जाणार असल्याचं निश्चित झालं आहे.

भाजपचे माजी मंडालाध्यक्ष हेमंत गायकवाड आणि त्यांची पत्नी माजी नगरसेविका संगीता गायकवाड यांनी भाजपचा राजीनामा दिला आहे. नाशिकमधील गायकवाड पती-पत्नी ठाकरे गटात प्रवेश करणार आहे. ठाकरेंच्या निवासस्थानी हा पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे.

हेमंत गायकवाड आधी शिवसेनेत सक्रिय होते. त्यानंतर त्यांनी राज ठाकरेंच्या मनसेत प्रवेश केला. काही वर्षांनी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपमध्ये असताना त्यांची पत्नी संगिता गायकवाड यांनी प्रभाग क्रमांक २० मधून निवडणूक लढवली. त्यानंतर त्यांची पत्नी नगरसेवक झाल्या होत्या. आता दोघेही पती-पत्नी ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. दोन्ही नेत्यांच्या ठाकरे गटातील पक्षप्रवेशामुळे नाशिक रोडवरील राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

ठाकरे गटाचे नेते दत्ता गायकवाड यांच्या मधस्थीने दोन्ही नेत्यांचा ठाकरे गटात प्रवेश होत आहे. रोहन देशपांड यांनीही विधानसभा निवडणुकीत मनसेचा राजीनामा दिला होता.त्यांनी आता ठाकरे गटात जाण्याचा निर्णय घेतला आहे. ठाकरे गटात जोरदार इनकमिंग सुरु असल्याने पक्षातील नेत्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. .

नाशिकमधील आणखी काही शिलेदार ठाकरे गटाच्या गळाला लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.दोन्ही बड्या नेत्यांच्या पक्षप्रवेशामुळे ठाकरे गटाला नाशिकमध्ये उभारी मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. दोन्ही नेत्यांच्या पक्षप्रवेशामुळे नाशिकमधील राजकीय चर्चांनाही उधाण आलं आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pakistan Afghanistan Conflict: पाकिस्तानकडून अफगाणिस्तानवर पुन्हा हवाई हल्ले; कुनार-पक्तिकामध्ये अनेक जण जखमी

दररोज खाव्यात अशा 7 हिरव्या भाज्या; शरीराला मिळतील ‘हे’ फायदे

Plane Crash: प्रशिक्षणादरम्यान विमान कोसळलं, २ भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू

Maharashtra News Live Update: डिजिटल पेमेंटवर लागणाऱ्या MDR शुल्कातून पेट्रोलपंपांना वगळा, CIPD ची मागणी

7 Grain Bhakri: वजन कमी आणि शुगर कंट्रोल करण्यासाठी रोज खा ७ धान्यांची भाकरी; मिळताता हे आरोग्यादायी फायदे

SCROLL FOR NEXT