bjp News Saam tv
महाराष्ट्र

Sangli : निवडणुकीत भाजपच्या अख्ख्या पॅनेलचे डिपॉझिटच जप्त, आता पक्षातच आरोप-प्रत्यारोप, या नेत्यावर टाकली पराभवाची जबाबदारी

BJP entire panel deposit seized in Tasgaon election : सांगली जिल्ह्यातील तासगाव नगरपरिषद निवडणुकीत भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारासह संपूर्ण पॅनेलचे डिपॉझिट जप्त झाले आहे. या पराभवानंतर भाजपमधील अंतर्गत गटबाजी आणि आरोप-प्रत्यारोप उफाळून आले आहेत.

Namdeo Kumbhar

विजय पाटील, सांगली प्रतिनिधी

Local Body Election Result : राज्यात नुकत्याच झालेल्या नगरपरिषद अन् नगरपंचायत निवडणुकीत भाजपला भरघोस यश मिळाले. भाजप राज्यातील नंबर एकचा पक्ष ठरला. पण सांगलीतील तासगाव निवडणुकीत भाजपच्या संपूर्ण पॅनलचे डिपॉझिट जप्त झालेय. निवडणुकीनंतर तासगावमधील भाजपमधील अंतर्गत गटबाजी समोर आली आहे. उमेदवार अन् कार्यकर्त्यांनी आपल्याच नेत्यावर थेट आरोप केले आहेत. पक्षातील अंतर्गत गटबाजी आणि भाजप किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस संदीप गिड्डे पाटलांना डावलल्याने भाजपचा पराभव झाल्याचे सांगण्यात येत आहे. या पराभवाला भाजप तालुका अध्यक्ष स्वप्नील पाटील जबाबदार आहेत, त्यांचा राजीनामा घ्या, अशी मागणी भाजप पदाधिकारी आणि भाजप उमेदवारांकडून करण्यात आली आहे.

देशात आणि राज्यात यशस्वी वाटचाल करणाऱ्या भाजपला सांगलीच्या तासगावमध्ये जबरच धक्का बसला आहे. तासगावच्या नगरपालिका निवडणुकीमध्ये भाजपाचे नगराध्यक्ष पदासह नगरसेवकपदांची निवडणूक लढणाऱ्या सर्व उमेदवाराचे डिपॉझिटच जप्त झाल्याने भाजपला धक्का बसला आहे. भाजपला आत्मपरीक्षण करायला लावणारा हा निकाल आहे. तासगाव भाजपात पक्षातील अंतर्गत गटबाजी आणि भाजप किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस संदीप गिड्डे पाटलांना डावलल्याने भाजपवर नामुष्की आली आहे. तर तासगाव नगरपरिषद निवडणुकीतील भाजप पराभवाला जबाबदार भाजप तासगाव तालुका अध्यक्ष स्वप्नील पाटील यांचा राजीनामा घ्या अन्यथा हक्कलपटी करा अशी मागणी तासगाव भाजप पदाधिकारी आणि भाजप उमेदवारानी केली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कडे लेखी तक्रार करून मागणी करणार असल्याची माहिती यावेळी भाजप पदाधिकारी यांनी केली आहे..

तासगाव तालुक्यात शहर मंडल व ग्रामीण मंडल अशी वेगवेगळी संघटनात्मक रचना असताना शहर मंडल मधील पूर्ण संघटना तसेच तासगाव शहरातील भाजपचे किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस संदीप गिड्डे पाटील यांना डावलून ग्रामीण मंडल अध्यक्ष स्वप्नील पाटील यांनी काहीही संबंध नसताना तासगाव नगरपालिका निवडणूकीत पूर्ण हस्तक्षेप केला.

तासगाव शहरातील भाजप संघटनेला आणि इच्छुक उमेदवारांना पूर्ण डावलले, तसेच पक्षाकडून आलेला निधी देखील तळापर्यंत वाटला नाही. असा आरोप भाजप पद्धधिकार्यानी तासगाव तालुका अध्यक्ष स्वप्नील पाटील याच्यावर करण्यात आला आहे. तसेच याचा परिणाम म्हणून पूर्ण राज्यात तासगाव ही एकमेव नगरपालिका अशी ठरली आहे. जिथे नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारासह संपूर्ण पॅनेलचे डिपॉझिट जप्त झाले आहे.यावर आता पालकमंत्री व पक्षश्रेष्ठी काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार; या तारखेला करणार युतीची घोषणा

Ladki Bahin Yojana: कोणत्याही गॅरंटीशिवाय लाडक्या बहिणींना मिळणार २५ लाखांचे कर्ज; सरकारची योजना आहे तरी काय?

Green Chilli Fry Recipe : जेवणासोबत तोंडी लावायला ही तिखट मिरची फ्राय एकदा करुनच बघा, वाचा रेसिपी

Pune : पुण्यातील नामांकित कॉलेज बाहेर रॅगिंग, विद्यार्थ्याला चौघांकडून बेदम मारहाण; थरारक VIDEO समोर

नगरपालिका निवडणुकीत मंत्र्यांचे बालेकिल्ले ढासळले, ११ ठिकाणी भाजपचा दारुण पराभव; कोणत्या नेत्यांना फटका बसला?

SCROLL FOR NEXT