Maharashtra politics : राज्यात भाजपला आणखी ४ आमदार मिळणार, इच्छुकांकडून मोर्चे बांधणी, कोण कोण इच्छुक?  Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra politics : राज्यात भाजपला आणखी ४ आमदार मिळणार, इच्छुकांकडून मोर्चेबांधणी, कोण कोण इच्छुक?

BJP MLC : महाराष्ट्रातील विधान परिषद निवडणुकीत भाजपला ४ जागा मिळण्याची शक्यता असून इच्छुकांमध्ये जोरदार चुरस सुरू झाली आहे. राज्यसभा न मिळालेल्या नेत्यांनीही आता विधान परिषदेकडे लक्ष वळवले आहे.

Ganesh Kavade

BJP MLC elections Maharashtra Legislative Council : आगामी विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील वातावरण आता चांगलेच तापू लागले आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीतील रिक्त ९ जागांपैकी ४ जागा भाजपच्या वाट्याला येणार आहेत. या ४ जागांसाठी भाजप नेत्यांकडून आतापासूनच जोरदार मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. ज्या नेत्यांना नुकत्याच झालेल्या राज्यसभा निवडणुकीत संधी मिळू शकली नाही, अशा इच्छुकांनी आता विधान परिषदेसाठी आपले नशीब आजमावण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्याशिवाय विधानसभेला पराभूत झालेले नेतेही विधानपरिषदेसाठी इच्छुक असल्याची माहिती समोर आली आहे.

चार जागांसाठी चुरस

मिळालेल्या माहितीनुसार, विधान परिषदेच्या आगामी निवडणुकीत भाजपच्या वाट्याला चार जागा येण्याची शक्यता आहे. या चार जागांसाठी भाजपमध्ये इच्छुकांची मोठी गर्दी तयार झाली आहे. यामध्ये प्रामुख्याने निंबाळकर, राम सातपुते आणि उपाध्याय यांची नावे आघाडीवर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. मे महिन्यामध्ये विधान परिषदेच्या काही जागा रिक्त होत असून, त्यासाठी भाजपने आपली रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे.

जुन्या चेहऱ्यांना पुन्हा संधी मिळणार?

केशव उपाध्ये, माधवी नाईक, रणजीत सिंह निंबाळकर, राम सातपुतेंसोबतच आणखी काही परिषदेसाठी इच्छुक असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. रणजीतसिंह मोहिते पाटील, संदीप जोशी, दादाराव केचे आणि संजय केणेकर यांच्या जागा रिक्त होणार आहेत, अशात यांच्यातून पुन्हा कोणाला संधी मिळते का? हे देखील महत्त्वाचे आहे. विधान परिषदेसाठी एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यात निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे. विधान परिषदेच्या ९ जागा १३ मे रोजी रिक्त होणार आहेत. त्यामध्ये भाजपचा ४ जागा मिळतील, असे दिसतेय.

राज्यसभेतील हुकलेले उमेदवार शर्यतीत

ज्या नेत्यांना राज्यसभेची उमेदवारी अपेक्षित होती परंतु ती मिळू शकली नाही, त्यांनी आता आपला मोर्चा विधान परिषदेकडे वळवला आहे. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे या इच्छुकांनी आपली दावेदारी मांडण्यास सुरुवात केली आहे. भाजप श्रेष्ठी आगामी निवडणुकांचे समीकरण लक्षात घेऊन कोणाच्या गळ्यात उमेदवारीची माळ टाकतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जळगाव महामार्गावर आज पहाटे भीषण अपघात

Ratnagiri : रत्नागिरीत भयंकर घडलं! सकाळी झोपेतून लवकर उठवल्याने सुनेची सटकली, सासूच्या डोक्यात फळी घातली नंतर...

Famous Actress : प्रसिद्ध अभिनेत्रीची व्यवसाय क्षेत्रात एन्ट्री; मुंबईजवळ सुरू केले हॉटेल, VIDEO चर्चेत

High Blood Pressure: रक्तदाब वाढण्यामागे फक्त मीठच नाही, या ६ चुका रोज करत असाल तर हृदयावर वाढतो मोठा ताण

धक्कादायक! कल्याणमध्ये महिलांना जबरदस्तीने वेश्याव्यवसायात ढकलणाऱ्या टोळीच्या आवळल्या मुसक्या; 20 पीडितांची सुटका

SCROLL FOR NEXT