BJP leaders expelled from the party following rebellion ahead of Nashik municipal elections. Saam Tv
महाराष्ट्र

मतदानाला काही तास शिल्लक..., माजी महापौरांसह 54 बड्या नेत्यांची हकालपट्टी, भाजपच्या इतिहासातील सर्वात मोठी कारवाई

BJP Expels Rebel Leaders Before Municipal Elections: मतदानाला काही तास शिल्लक असताना भाजपने मोठा निर्णय घेत 54 बंडखोर नेत्यांची हकालपट्टी केली. माजी महापौरांसह अनेक माजी नगरसेवकांवर कारवाई झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Omkar Sonawane

निवडणुकीला काही तास शिल्लक असताना राजकारणात मोठ्या घडामोडी पाहायला मिळत आहे. उपऱ्यांना उमेदवारी दिल्याने भाजपच्या निष्ठावंतांनी थेट बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले होते. यामध्ये सर्वात जास्त बंडखोरी ही नाशिकमध्ये दिसून आली. यानंतर संकटमोचक गिरीश महाजन हे शहरात तळ ठोकून होते. त्यांनी सर्व बंडखोरांची भेट घेत त्यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्यास सांगितले होते. मात्र त्यांना यामध्ये यश आले नाही. हे सर्व निवडणूक लढवण्यावर ठाम असल्याने आता पक्षाने त्यांच्यावर कारवाई केली आहे.

तब्बल 54 बंडखोरांची हकालपट्टी भाजपकडून करण्यात आली आहे. अपक्ष उमेदवारी आणि पक्षाची शिस्त मोडल्याने ही कारवाई केल्याचे भाजप शहराध्यक्ष सुनील केदार यांनी सांगितले. यामध्ये माजी महापौरांसह 20 माजी नगरसेवकांचा समावेश आहे. भाजपच्या इतिहासातील ही सर्वात मोठी कारवाई असल्याचे सांगितले जात आहे. मात्र या कारवाईमुळे राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ माजली आहे.

आगामी कुंभमेळाच्या पार्श्वभूमीवर भाजपला पुन्हा महापालिका ही काबीज करायची आहे तर ज्यांना डावलले गेले ते देखील त्यांना देखील या कुंभमेळाच्या शाही स्नानामध्ये डुबकी मारायची असल्याने त्यांनी देखील बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याने भाजपला मोठ्या रोषाला सामोरे जावे लागले.

कोणाची केली हकालपट्टी?

माजी महापौर अशोक मुर्तडक, सतीश सोनवणे, शशिकांत जाधव,कमलेश बोडके, माजी गटनेते दिलीप दातीर, अनिल मटाले, माजी नगरसेवक पूनम सोनवणे, मीरा हांडगे, सुनीता पिंगळे, अंबादास पगारे, अलका अहिरे, रुची कुंभारकर, सचिन हांडगे, प्रकाश दीक्षित, रतन काळे, ऋषिकेश आहेर, ऋषिकेश डापसे, कैलास अहिरे, सतनाम राजपूत, गणेश मोरे, किरण गाडे, मंगेश मोरे, शाळीग्राम ठाकूर, कल्पेश ठाकूर, मनोज तांबे, शरद शिंदे, शरद इंगळे, प्रभा काठे,

स्मिता बोडके, योगिता राऊत, बाळासाहेब घुगे, शंकर विधाते, प्रेम पाटील, रत्ना सातभाई, सविता गायकर, राहुल कोथमिरे, शीतल साळवे,मुकेश शहाणे, पंडित आवारे, दामोदर मानकर, कन्हय्या साळवे, वंदना मनचंदा, शीला भागवत, नंदिनी जाधव, बाळासाहेब पाटील, राजेश आढाव, जितेंद्र चोरडिया, सचिन मोरे, अमित घुगे, ज्ञानेश्वर काकड, ज्ञानेश्वर पिंगळे, चारुदत्त आहेर, तुषार जोशी, आणि एकनाथ नवले यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

महापालिका निवडणुकीत पैशांचा पाऊस, अपक्ष उमेदवाराने पकडली २० लाखांची रोकड, राजकारण खळबळ|VIDEO

Amruta Deshmukh: साडीत उंदीर,घाणेरडं वॉशरुम; पुण्याच्या बालगंधर्व रंगमंदिराच्या दयनीय अवस्थेवर मराठी अभिनेत्री संतापली

Braid Hairstyle: फंक्शन किंवा लग्नाला साधा अंबाडा बांधण्यापेक्षा ट्राय करा हे ५ सुंदर वेणीचे प्रकार

Rasmalai Recipe : मकर संक्रांत स्पेशल रसमलाई, घरीच १० मिनिटांत मिठाई तयार

Maharashtra Live News Update : बुलढाण्यात चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव कार डिव्हायडरवर आदळली

SCROLL FOR NEXT