bjp Zilla Parishad result  Saam tv
महाराष्ट्र

Explainer : जिल्हा परिषदेत भाजप सर्वात मोठा पक्ष, देवेंद्र-रविंद्र यांची जोडी पुन्हा हिट, काय आहेत विजयाची कारणे?

bjp Zilla Parishad result : जिल्हा परिषदेच्या निकालानंतर भाजप सर्वात मोठा पक्ष ठरल्याचे स्पष्ट झाले. या निवडणुकीतही देवेंद्र-रविंद्र यांची जोडी हिट ठरली.

Vishal Gangurde

जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भाजप मोठा पक्ष

भाजपने उधळला विजयाचा गुलाल

देवेंद्र -रविंद्र पुन्हा ठरले हिट

राज्यात १२ जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. महायुतीतील घटक पक्षामध्ये भाजपने सर्वाधिक जागा पटकावल्या आहेत. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीतही भाजपने विजयाचा गुलाल उधळला आहे. महापालिका निवडणुकीप्रमाणे जिल्हा परिषदेतही भाजपची विजय घौडदौड पाहता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांची जोडी पुन्हा हिट ठरली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रविंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वात भाजपने निवडणुका लढवल्या. नोव्हेंबर महिन्यात नगरपरिषदेच्या निवडणुका झाल्या. त्या निवडणुकीत भाजपची सरशी पाहायला मिळाली. पुढे जानेवारी महिन्यात महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या. त्यातही भाजपने सर्वाधिक जागा जिंकल्या होत्या. आता फेब्रुवारीत जिल्हा परिषद निवडणुकीत देवेंद्र फडणवीस आणि रविंद्र चव्हाण यांनी कमाल केल्याचं दिसून आलं.

काय आहेत भाजपच्या विजयाची कारणे?

भाजपने जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत नियोजनावर भर दिल्याचे दिसून आलं. निवडणुकीत प्रभावी प्रचार यंत्रणा पद्धती वापरल्याचे दिसून आले. भाजपचे उमेदवारांनी निवडणुकीत सोशल मीडियाचाही प्रभावी वापर केला.

निवडणुकीत तिकीट वाटपादरम्यान राज्य पातळीवरील पक्षाचा थेट संवाद आणि समन्वयासाठी उच्च दर्जाची यंत्रणा वापरल्याचे दिसून आले. स्थानिक नेतृत्वाला बड्या नेत्यांच्या सभेची मदत झाली. त्यामुळे मतदारांवर सकारात्मक परिणाम झाल्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही अनेक ठिकाणी सभा घेतल्या होत्या. त्यांच्या सभेचा फायदा उमेदवारांना झाला.

रविंद्र चव्हाण यांनी केलेली संघटन बांधणी फायदेशीर ठरली. भाजपची विचारधारा मानणाऱ्या कार्यकर्त्यांना आणि मतदारांना जोडण्याचे काम त्यांनी केले. देवेंद्र फडणवीस यांचा पाठिंबा आणि सहकार्याच्या जोरावर रविंद्र चव्हाण यांनी यशस्वी कामगिरी केल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai To Shirdi : साईनगरी शिर्डीला जाताय? मुंबईहून कमी खर्चात 'या' सोप्या मार्गाने करा प्रवास

Maharashtra News Live Update : कल्याण बुद्धभूमी फाऊंडेशन प्रकरण; बुद्धभूमीकडून १५ जूनपासून बेमुदत धरणे आंदोलनाची घोषणा

खुशखबर! लाडक्या बहि‍णींना १५०० रुपये कधी मिळणार? महत्त्वाची अपडेट समोर

Mumbai Women's T20 League: सोबो मुंबई फाल्कन्सच्या महिलांनी रचला इतिहास, पहिल्याच मुंबई लीगमध्ये शानदार विजेतेपदाचा मान

आता १८ वर्षावरील व्यक्तीला आधार कार्ड नाहीच; 'या' राज्य सरकारनं घेतला मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT