Parbhani News  Saam tv
महाराष्ट्र

परभणीत कमळ फुललं; साम टीव्हीचा एक्झिट पोल खरा ठरला, कोणत्या पक्षाचे किती उमेदवार विजयी?

Parbhani News : परभणी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भाजपचा डंका पाहायला मिळत आहे. परभणीत भाजपचे सर्वाधिक उमेदवार निवडून आले आहेत.

Vishal Gangurde

परभणीत भाजपचा बोलबाला

भाजपकडून विरोधी पक्षातील उमेदवारांना दणका

साम टीव्हीचा एक्झिट पोल खरा ठरला

विशाल शिंदे, साम टीव्ही

परभणी जिल्हा परिषदाच्या निवडणुकीत भाजपचा बोलबाला पाहायला मिळत आहे. या निवडणुकीत भाजपने जोरदार आघाडी घेतली आहे. परभणीत महायुतीमधील घटक पक्षांनी महाविकास आघाडीमधील पक्षांना जोरदार दणका दिल्याचे दिसून येत आहे. परभणीत भाजप सत्तेत येणार असल्याचा दावा साम टीव्हीने एक्झिट पोलने केला होता.

राज्यात १२ जिल्हा परिषदांच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीचा निकाल आज सोमवारी जाहीर होत आहे. १२ जिल्ह्यापैकी परभणीत जिल्हा परिषदांच्या निवडणूक पार पडली. परभणी महापालिकेत ठाकरे गट अव्वल ठरला. त्यानंतर जिल्हा परिषदेत कोण जिंकणार, याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं होतं. त्यानंतर झालेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भाजपने विरोधकांना जोरदार झटका दिला आहे.

परभणी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस दुसरा मोठा पक्ष ठरला आहे. शिंदे आणि ठाकरे गटाचे अनुक्रमे ५ ते ६ उमेदवार निवडून आले आहेत. तर वंचित बहुजन आघाडीचा एकही उमेदवार निवडून आलेला नाही. त्यामुळे जिल्हा परिषदेवर सत्ता स्थापन करण्याची संधी भाजपला चालून आली आहे. भाजप अजित पवार गटाच्या मदतीने सत्ता स्थापन करून शकतो.

परभणी जिल्हा परिषदेचा निकाल

54/54

भाजप : 24

Ncp:- 15

शिवसेना : 05

शिवसेना UBT: 06

काँग्रेस : 03

वंचित : 00

MIM: 00

अपक्ष :01

जिल्हा परिषदेचा एक्झिट पोलचा अंदाज काय होता?

परभणी (५४)

भाजप - २१

शिंदे सेना - ८

राष्ट्रवादी (AP) - १४

ठाकरेसेना - ५

काँग्रेस - ४

राष्ट्रवादी (SP) - ०

रासप १

वंचित १

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune : पुण्यात भयंकर अपघात, चिमुकल्या बहीण-भावाला ट्रेम्पोनं चिरडलं, हसत्या-खेळत्या घरावर दु:खाचा डोंगर

Nanded ZP School: जिल्हा परिषदेची शाळा कोणत्या गावाची? शाळेचा वाद थेट पोलिसांच्या दारात, काय आहे प्रकरण?

दिव्यांग बोगस प्रमाणपत्र प्रकरण अंगलट; 3 बड्या अधिकऱ्यांचे निलंबन तर तिघांना बडतर्फ

1 Gram Gold Mangalsutra: सोन परवडत नाही? पण सोन्याचं मंगळसूत्र पाहिजे? ट्राय करा 1 ग्रॅम सोन्याचे ट्रेंडी मंगळसूत्र

Maharashtra Live News Update: बच्चू कडू यांनी येवल्याच्या प्रांताधिकारी कार्यालयावर फेकले कांदे

SCROLL FOR NEXT